“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना”@मूल महरात ०१ मे पासून कार्यान्वित

266

मूल :-

     मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे “हिन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” केंद्र स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.त्या निर्देशाचा अनुषंगाने आरोग्य विभाग जिल्हा परिषद, चंद्रपूर व तालुका आरोग्य अधिकारी मूल यांच्या संयुक्त विद्यमाने

तालुका आरोग्य अधिकारी मूल अंतर्गत ताजाळा रोड, एल्गार ऑफीस च्या बाजुला वार्ड नं ११, येथे हिंन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तालुकास्तरीय लोकापर्ण दि. ०१ मे २०२३ रोज सोमवारला सकाळी १०.०० वाजता माननिय ना. एकनाथजी शिन्दे साहेब.

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते ऑनलाईन डिजीटल प्रणालीडारे लोकार्पण करून सुरु करण्यात येत आहे. करीता सदर कार्यक्रमात समस्त जनतेने उपस्थित राहावे ही विनंती मुळ भागातील जन सामान्य, गोरगरीब, झोपडपट्टीत भागात राहणा-या नागरीकांसाठी १५ वा वित आयोग अंतर्गत येथील जनतेला गावातच आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने सदर आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे.