भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मूल बंदचे आवाहन@चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत यांच्यावर गोळीबार थोडक्यात बचावले

87

मूल तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर अज्ञात इसमाने दिनांक ११/०५/२०२३च्या रात्री ९-९.३०च्या दरम्यान केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ आज दिनांक १२/०५/२०२३ शुक्रवारला मूलशहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी काँग्रेसभवन मूल येथे उपस्थित राहण्याची सूचना काँग्रेस कमेटिचे वतीने करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्यावर गुरुवारी रात्री ९:१९ वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या एका बुरखाधारी अज्ञात इसमाने बंदुकीतून गोळी झाडली. सुदैवाने गोळी हाताला चाटून गेल्याने रावत या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. या घटनेने मूल शहरात प्रचंड खळबळ माजली आहे. रावत यांना मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संतोषसिंह रावत हे काँग्रेस नेते असून माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक आहेत. घटनेनंतर मूल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेसमोर संतोषसिंग रावत यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर एकत्र आले. त्यांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले होते. घटनेनंतर संतोषसिंग रावत यांनी थेट मूल पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करून आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे. वृत्त
लिहीपर्यंत पोलिसांना आरोपी
चुकल्याने बंदुकीची गोळी रावत यांच्या हाताला चाटून गेली. यामुळे रावत थोडक्यात बचावले. मूल शहरात अचानक झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. उद्या दिनांक १३ मे मूल (चंद्रपूर) रोजी बाजार समित्यांच्या सभापती पदांची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेकडे बघितले जात आहे. रावत यांच्यावर गोळी झाडणारा त्यांचा विरोधक कोण आहे? या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
कारमधून बुरखाधारी एक हल्लेखोर मागच्या दारातून बाहेर आला आणि काहीही कळायच्या आत त्याने रावत यांच्यावर गोळीबार केला. मात्र त्याचा निशाणा
चुकल्याने बंदुकीची गोळी रावत यांच्या हाताला चाटून गेली. यामुळे रावत थोडक्यात बचावले. मूल शहरात अचानक झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. उद्या दिनांक १३ मे मूल (चंद्रपूर) रोजी बाजार समित्यांच्या सभापती पदांची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेकडे बघितले जात आहे. रावत यांच्यावर गोळी झाडणारा त्यांचा विरोधक कोण आहे? या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.

आंदोलनाचा इशारा या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत यामागील मुख्य सूत्रधार कोण ? याचा
तातडीने शोध घ्यावा अन्यथा जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा
इशारा राज्याचे माजी मंत्री, व आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.