त्या रस्त्याचे काम आजही अर्धवट@मुल शहरातील

90

मुल शहरातील रस्त्याचे काम अर्धवट सार्वजनिक बांधकाम विभाग, पालिका प्रशासनाला आश्वासनाचा विसर

येथील गांधी चौक ते विश्राम गृ​ह रोड पर्यंत सार्वजनिक वहिवाटीसाठी सार्वजनिक रस्ता जुन्या वस्तीतील नागरीकांसाठी रस्त्यावर पावसाळ्यात कंबरेएवढे पाणी साचते. पावसाची सुरुवात होताच या परिसरातील वीज पुरवठाही खंडित होतो. या सर्व समस्यांमधून सुटका होण्यासाठी या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.जुन्या वस्तीमधील वार्ड क्रमांक 12 मधील अर्धवट रस्ताचे बांधकाम पूर्ण करून देण्यात यावा अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले.
घोषणापत्रानुसार वार्ड नंबर 12 मधील सर्वेनंबर 953 व 938 या जागेतून 4 मीटर रूंद व 35 मीटर पूर्व पश्चिम लांबीचा रस्ता अतिक्रमण असल्यामुळे पूर्णत्वात जावू शकला नव्हता परंतू दिनांक 08 मे 2023 ला सोमवारला अतिक्रमण काढून रस्ता मोकळा झाला असल्यामुळे तातडीने या रस्ताचे बांधकाम करून रस्ता नागरीकांसाठी वाहतूकीसाठी उपलब्ध करून देण्यात यावा अशी जुन्या वस्तीमधील वार्ड क्रमांक 12 मधील नागरीकांची मागणी आहे.

गेल्या पावसाळ्यात नागरिकांनी रस्त्याच्या कामासाठी आंदोलन देखील केले. पालिका अधिकाऱ्यांनी पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही या रस्त्याचे काम झाले नसून तो रस्ता आजही अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्याचे काम गेले कित्येक वर्षे झालेले नाही. हा भाग सखल असल्याने पावसाळ्यात दरवर्षी येथे पाणी साचते. थोडासा पाऊस झाला तरी रस्त्यावर पाणी साचते. पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होते. या त्रासाला नागरिक कमालीचे त्रासले असून गेल्या वर्षी नागरिकांनी संतापून उग्र आंदोलन केले होते.

पालिका प्रशासन पुढील पावसाळ्याची वाट पाहात आहे का? हवामानातील बदलामुळे पाऊस कधी पडेल कधी नाही हे सांगता येत नाही. हे काम करण्यात कोणालाच रस दिसत नाही. रस्त्याच्या कामासाठी येथील रहिवासी सातत्याने ओरड करीत आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग,पालिका प्रशासनास अद्यापही जाग येत नाही आहे.

नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत केवळ पाहिला जात आहे. पुढील पावसाळ्याअगोदर काम न झाल्यास नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरतील. – अलीम पठाण,जुन्या वस्तीमधील नागरीक स्थानिक रहिवासी.