नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविदयालय, मूल निकाल ९९.५३%

165

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज गुरुवारी (दि. २५) दुपारी दोन वाजल्यापासून ऑनलाइन जाहीर झाला आहे. 
यंदा राज्यात निकाल ९१.२५ टक्के लागला असून १२ लाखाहूनही अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 96.01 तर सर्वात कमी निकाल मुंबई 88.13 टक्के लागला आहे. अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

मुल शहरातील नवभारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल खालील प्रमाणे

प्रथम :- कु. पलक आनंदराव फलके ७८.५०%

कु. सुजाता बंडु भउके ७५.५०%
श्रवण सुनिल तोटावार →७३.००%

—————————————————

M.C.V.c.
इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी
पंकज रामदास कावळे ६५.८३

निर्णय ओमप्रकाश दुथे ६५.१७%

माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल चे 12 वी परीक्षेत सुयश

मूल येथील माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मुल शाळेनी दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण 100% निकाल दिला आहे. शाळेतून विद्या पाल 68.17% घेऊन प्रथम क्रमांक तर दीक्षाताई मेश्राम 67.17% आणि स्विटी रेडिवार 65.67% अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला.

सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक भाऊराव झाडे, प्रभारी मुख्यध्यापक अस्पाक सय्यद, ज्युनिअर कॉलेज इन्चार्ज दुष्यंत गणवीर व इतर शिक्षक आणि शिक्षकत्रेर कर्मचारी तर्फे अभिनंदन करण्यात आले.

गुण पडताळणीसाठी २६ मे पासून करा अर्ज
ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांतील गुणांची पडताळणी करता येणार आहे. उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने (http://verification.mhe hsc.ac.in) या संकेतस्थळावरून स्वत: तसेच कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी,शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना बारावीची गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र त्यांच्या शाळा महाविद्यालयामार्फत ५ जून पासून दुपारी तीन नंतर वितरित करण्यात येतील.

 

 

H
PRAD