फुटपाथ दुकानदारांना न. प. ने पर्यायी व्यवस्था करुन दिल्याशिवाय हटणार नाही (श्रमिक बहुउद्देशीय पथविक्रेता संघटनेची मागणी )

108

 मुल – मुल शहरात नियमीत पणे व्यवसाय करण्याची संधी देवुन फुटपाथवरील दुकानदारांना नगर परिषद प्रशासन पर्यायी व्यवस्था करुन दिल्याशिवाय आम्ही हटणार नाही अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे संघटनेने नगर परिषद मुख्याधिकारी मान अजय पाटणकर यांचेकडे केली आहे.
मुल नगरात मुख्य रस्त्याच्या कडेला अनेक बेरोजगार फुटपाथचा आधार घेऊन अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबाची पोटाची भाकर कमाऊन आपला उदरनिर्वाह करीत आहेत.परंतु तलाव व शहर सौंदर्यीकरण करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमणाची नोटीस दिल्याने आपल्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी नक्की येणार यासाठी आपल्या मागण्या काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचेकडे गेले असता त्यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार काँग्रेसचे जिल्हा महासचिव व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा माजी न.प.उपाध्यक्ष राकेश रत्नावार व्यांचे नेतृत्वात मुख्याधिकारी यांना फुटपाथ दुकानदारांचे लेखी निवेदन देऊन बेरोजगार यांच्या पोटाची भाकर हिराऊ नये प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी अशी विनंती निवेदन देऊन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचेशी चर्चा केली.
कुंटुबांचे उदरनिर्वाहाकरीता १० ते १५ वर्षापासुन मेन रोडला लागुन असलेल्या फुटपाथवर छोटे दुकान लावुन व्यवसाय करीत आहेत. मौजा मुल येथील सर्व्हे क्रमांक ८६३ व ८६७ या नगरपरिषद मुल च्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण केल्याबाबत नोटीस प्राप्त झालेली आहे. भुमापन क्रमांक ८६३ ही भोगवटदार सरकार रस्ता व भूमापन क्रमांक ८६७ ही सरकार पाण्याखालील जागा आहे. सदर जागेवर आमचे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण नाही. आम्ही फुटपाथवरील अस्थायी दुकान टाकुन आपला व्यवसाय करीत आहोत.
मुल नगरपरिषद क्षेत्रात स्ट्रिट वेंडर अॅक्ट २०१४ लागु असुन किरकोड विक्रेत्याचे सर्वेक्षण, नगर विक्रेता समिती तयार झालेली असुन व पुर्नवसन केल्याशिवाय कोणत्याही किरकोड विक्रेत्याला हटविता येत नाही.
महाराष्ट्र स्टेट हायवे अॅक्ट मधील तरतुदी नुसार व त्याअनुषगांने राज्यशासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार रोड लाईन, बिल्डींग लाईन व कंट्रोल लाईन मध्ये अनेकांनी पक्के घरे व दुकानाचे बांधकाम केले असतांना केवळ आम्हा गरीब व किरकोड विक्रेत्यांनाच नोटीस देवून भेदभाव केला असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे. सदर फुटपाथवरील व्यवसाय हाच आमचे कुंटुबाचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असुन या व्यतीरीक्त आमचे कुंटुबात उत्पनाचे दुसरे कोणतेही साधन नाही. सदर दुकाने हटविल्यास आमचे कुंटुंबावर उपासमारीची वेळ येणार असुन आमचे कुंटुब हे उघडयावर पडणार आहे.
करीता सर्वकष बाबीचा विचार करुन प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय आमचे फुटपाथवरील दुकाने हटविण्यात येवु नये व आम्हाला पुर्वपार व्यवसाय करण्याची संधी दयावी अशी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देऊन चर्चा करतांना सभापती राकेश रत्नावार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, काँग्रेस कार्यकर्ते अभिजित चेपूरवार फुटपाथ संघटनेचे अध्यक्ष अरुण खोब्रागडे,काजू खोब्रागडे,शैलेश देशत्तीवार,अतुल नीमगडे,सचिन जम्पलवार, प्रमोद मशाखेत्री,अरमान शेख,बंडू आदमने,बंडू साखलवार,गोलू पोचंमपलीवर,सागर जम्पलवार यांचेसह अनेक फुटपाथ धारक उपस्थित होते.