जुलै महिन्यापासून १५०० रुपयाचे अनुदान@विशेष साहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार लाभ 

74

विशेष साहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार लाभ  जुलै महिन्यापासून १५०० रुपयाचे अनुदान
देशातील गरीब व गरजू  लोकांसाठी केंद्र सरकारच्या   माध्यमातून राज्यातील  निराधार  लोकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.

लोकांच्या हितासाठी राज्य शासनाने ५ जुलैला शासन निर्णय काढून १५०० रुपये जुलै २०२३ पासून अर्थसाहाय्य मिळणार आहे. यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

या निर्णयामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शासनाकडून १८ ते ६४ वयोगटातील निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, घटस्फोटीत स्त्रिया, दुर्लक्षित स्त्रिया, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तसेच तृतीयपंथी यांना शासनाकडून आर्थिक साहाय्य पुरविले जाते. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून या लाभार्थ्यांना एक हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जात होते. आता यामध्ये ५०० रुपयांची वाढ केली असून, १५०० रुपये प्रति महिना अनुदान या लाभार्थ्यांना मिळणार आहे.

सामाजिक व विशेष साहाय्य विभागामार्फत अनुदान देण्याच्या निर्णय ५ जुलैच्या शासन निर्णयानुसार १५०० रुपये अर्थसाहाय्य जुलै महिन्यापासून देण्यात येईल. तसेच हयात प्रमाणपत्राच्या तरतुदीमध्ये बदल करण्यात आले असून, लाभार्थ्यांनी त्याच आर्थिक वर्षात हयात प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्याचे बंद केलेले अर्थसाहाय्याचे वाटप पूर्ववत देण्याचा निर्णय घेतला आहे.

लाभार्थ्यांच्या मुलाची २५ वर्षे वयाबाबतची अट रद्द करण्यात आली असून, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्याच्या मुलाला नोकरी मिळाल्यानंतर कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्यांची पात्रता ठरविण्यात येणार आहे.