खरीप हंगामातून मिळतेय अर्थार्जनाला गती!गावातच मिळतोय नियमित रोजगार : मजूर वर्गात संचारला उत्साह
खरीप हंगामालाजोमात सुरुवात झाली असून, या हंगामातून अर्थार्जनाला गती मिळाली आहे. एकमेव पीक म्हणून सर्वत्र धान पिकाची लागवड केली जाते.
या धान पिकावरच ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मजुरांच्या हातात पैसा खेळू लागला आहे. मजूर वर्गात उत्साह असून, आनंदाचे वातावरण आहे. खरीप हंगामाला पावसाळ्यात अर्थात जून महिन्यापासून सुरुवात होऊन डिसेंबरपर्यंत हा हंगाम असतो.
मुल तालुक्यातील कोसंबी,मोरवाही, व परिसरात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने सध्या तुरळक प्रमाणात धान रोवणीला सुरुवात झाली आहे.
रोवणीचे एक वैशिष्ट म्हणजे यावेळी कितीही मजूर असले तरी, मजुरांची टंचाई भासते. रोवणी उत्सवातून अनेक महिलांसह पुरुष मजुरांना गावातच काम उपलब्ध होते. शिवाय, त्याचबरोबर शेती व्यवसायाशी संबंधित विविध क्षेत्रातही अर्थार्जन होत असते.
यात कृषी केंद्रे तसेच ट्रॅक्टर मालक व चालक यांचेही अर्थचक्रखरीप हंगामाच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. कुटुंबाच्या प्रपंचाचा गाडा, मुला-मुलींचा शैक्षणिक खर्च, लग्नकार्य यासह पुढील हंगामाच्या खर्चाचे नियोजन आदी बाबींचा यात समावेश आहे. खरीप हंगामासाठी शेतात नर्सरी तयार करून अगोदर पन्हे
टाकली जातात. साधारणतः जून महिन्याच्या पंधरवड्यात पन्हे टाकण्यास सुरुवात होते.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात आवते शिंपले जाते. मात्र, यावर्षी उशिरा पाऊस पडल्याने खरीप हंगाम उशिरा सुरू झाला.
शेतीतून सातत्याने काम मजूर वर्गाला खरीप हंगामात सातत्याने काम उपलब्ध करून देण्याची संधी फक्त शेतीतच आहे. रोवणीचा हंगाम जवळपास एक महिना चालतो.
रोवणी संपत नाही तोच शेतात पिकातील निंदण काढण्याचे काम सुरु होते. त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत हलक्या प्रजातीचे धान पीक कापणीस येतात. साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत खरीप हंगाम असतो.