मुल शहर@निधी पूर्ण रस्त्यासाठी; मात्र काम झाले अर्धेच !

56

मूल : येथील गांधी चौक ते विश्रामगृह रोडपर्यंतचा रस्ता अपूर्ण असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याशिवाय पावसाळ्यात तर येथे तळे साचत असते. त्यामुळे नागरिकांना चांगलीच सर्कस करावी लागत आहे.
 वॉर्डातील या मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात कंबरेएवढे पाणी साचते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. या सर्व समस्यांमधून सुटका होण्यासाठी या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी लावून धरली आहे.

याबाबत जुनी वस्ती ( वार्ड क्रमांक 12 ) मधील अर्धवट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करून देण्यात यावे याकरिता निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले. वॉर्ड क्रमांक 12 मधील सर्वे नंबर 953 व 938 या जागेतून 4 मीटर रूंद व 35 मीटर पूर्व पश्चिम लांबीचा रस्ता अतिक्रमण असल्यामुळे पूर्णत्वात जाऊ शकला नव्हता, परंतु 8 मे 2023 ला नगरपरिषदेतर्फे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा झाला असल्यामुळे तातडीने या रस्ताचे बांधकाम करून रस्ताअद्यापही या रस्त्याचे काम झाले नसून तो रस्ता आजही अर्धवट अवस्थेत आहे.

रस्त्याचे काम गेले कित्येक वर्षे झालेले नाही. हा भाग सखल असल्याने पावसाळ्यात दरवर्षी येथे पाणी साचते. थोडासा पाऊस झाला तरी रस्त्यावर पाणी साचते. पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होते. या त्रासाला नागरिक कमालीचे त्रासले असून गेल्या वर्षी नागरिकांनी संतापून आंदोलन केले होते.नगर परिषद मूलअंतर्गत येणाऱ्या वॉर्ड नं. १२ मधील सर्व्हे नंबर ९५३ व ९३८ या जागेतून चार मीटर रुंदी व ३५ मीटर पूर्व पश्चिम लांबीचा रस्ता सार्वजनिक असून, नगर परिषदेने रीतसर वर्तमानपत्रात निविदा देऊन मंजूर करून घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अर्धा रस्ता तयार करण्यात आला आहे. पूर्ण रस्ता न केल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नगर परिषद अंतर्गत विश्रामगृहाजवळ स.नं. ९५३ व ९३८ मधून सार्वजनिक रस्ता होण्याची मागणी गेल्या २० ते २५ वर्षांपासून नागरिक करीत आहेत. नगर परिषद मूलकडे वारंवार निवेदन देऊन रस्ता करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मागील वर्षी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अर्धा रस्ता तयार करण्यात आला.
मात्र, विश्रामगृहाकडे जाणारा रस्ता तयार करण्यास अडथळे निर्माण झाल्याने नगर परिषदेने वर्तमानपत्रात जाहीर निविदा देऊन रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला. हा रस्ता तयार करण्यास सर्व बाबी अनुकूल असताना मात्र नगर परिषद प्रशासन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार मागणी केल्यानंतर या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. मात्र बांधकाम विभागाने केवळ अर्धवट रस्ता करून त्रासच दिला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी वॉर्डवासीयांनी केली आहे