गृरुकुंज आश्रमला दिले १ लाख १० हजार रुपये@वडिलांची शेवटची इच्छा मुलीने केली पूर्ण

52

वडिलांची शेवटची इच्छा मुलीने केली पूर्ण, गृरुकुंज आश्रमला दिले १ लाख १० हजार रुपये

 

चंद्रपूर – घुग्घुस येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ आगलावे यांनी गुरुकुंज आश्रमास एक लाख रुपये देण्याची तयारी दाखविली. मात्र, ते हा निधी आश्रमाला देण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

त्यांना पाच मुली असून, त्यांनी आपल्या वडिलांची शेवटची इच्छा म्हणून नुकतेच गुरुकुंज आश्रमाला एक लाख १० हजार रुपये देणगी दिली व वडिलांनी आश्रमाला दिलेला शब्द पूर्ण केला.

ही रक्कम पुण्यतिथी महोत्सवात ५१ हजार रुपये जनार्दनपंत बोढे यांना, तर आश्रमातील अन्नदान विभागाकरिता ५१ लाख रुपये व प्रचार विभागाला ८ हजार, असे एकूण १ लाख १० हजार रुपये आर्थिक सहयोग राशी गुरुकुंज आश्रमाला दिली. याबद्दल त्या सर्व विवाहित मुलींचा आश्रमातर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

बहुउद्देशीय वारकरी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य प्रेमलालभाऊ पारधी, ग्रामगीताचार्य बुटले गुरुजी तथा उपासक साहसराम दादा बिसेन, रामचंद्र डोंगरे, रमेश बोबडे यांची उपस्थिती होती.