पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र नोंदणी करण्याची मुदत दिनांक २२.०९.२०२३ पर्यंत

61

 

पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र नोंदणी करण्याची मुदत दिनांक २२.०९.२०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे.दिनांक १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग याने पवित्र – शिक्षक भरती 2022 ची प्रथम पायरी सुरु केली आहे . या मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी- २०२२ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत. व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 दिलेल्या उमेदवारांना पवित्र प्रणालीवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी अपलोड करणेसाठी आवश्यक कागदपत्राची यादी व उमेदवारांच्या स्व-प्रमाणपत्रासाठी फ्लो चार्ट संबंधी माहिती शासनाच्या अधिकृत वेबसाईट (https://mahateacherrecruitment.org.in/) वर जाहीर केलेली आहे.

उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक ०१/०९/२०२३ ते दिनांक १५/०९/२०२३ पर्यंत मुदत देण्यात 

पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र नोंदणी करण्याची मुदत दिनांक २२.०९.२०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

उमेदवारांसाठी सूचना

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी- २०२२ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत.

१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०२२ ही दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ३/३/२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे.

२. या चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे.

३. उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

वाचा   ALERTE Income Taxpayers! Departments established a deadline; these taxpayers’ PAN cards would be cancelled after March 31

४. सन २०१८ व २०१९ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षामध्ये गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना मा.उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका ( Stamp ) क्र ४४३४ / २०२३, १८२४/२०२३ व खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचीका क्र १९५३/२०२३ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ या चाचणीस प्रविष्ट होता येत नसल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे सदर उमेदवारांनी सहभागी होऊ नये, ते सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्ध होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

५. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे. उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरीत करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेश पत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेश पत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते, असे असतानाही काही उमेदवार एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झालेल्या

उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ते सहभागी करून घेता येणार नाही. यामुळे सदर उमेदवारांनी सहभागी होऊ नये, सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्ध होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

६. उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक ०१/०९/२०२३ ते दिनांक १५/०९/२०२३ पर्यंत मुदत देण्यात येत आहे.

७. ज्या उमेदवारांच्या TET / CTET च्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील आपण निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडून सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, ओळखीच्या पुरावा व सबंधित कागदपत्रे यासह संपर्क साधावा. सदरची सुविधा लवकरच देण्याबाबत स्वतंत्रपणे पोर्टलवर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

वाचा   शासकीय नौकरी करिता वयोमर्यादा शिथिल: आजची खुशखबर Age limit relaxed for government jobs: Today’s good news

८. सन २०१९ मध्ये पवित्र पोर्टलमार्फत दिनांक ९/८/२०१९ रोजी प्रसिद्ध

झालेल्या यादीतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले व माजी सैनिक यांच्या रिक्त राहिलेल्या जागांकरीता गुणवत्तेनुसार पुढील उमेदवारांसाठी यादी प्रसिद्ध करावयाची आहे, त्यासाठी जिल्ह्याकडील माहिती प्राप्त झाली आहे, त्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे, याबाबतच्या स्वतंत्र सूचना देण्यात येतील.

९. स्व-प्रमाणपत्र करण्यासाठी अडचण आल्यास edupavitra2022@gmail.com या इमेल वर संपर्क साधता येईल.

[read this शासकीय नौकरी करिता वयोमर्यादा शिथिल]

read this 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2024

आवश्यक कागदपत्राची यादी

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 दिलेल्या उमेदवारांना पवित्र प्रणालीवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण

करण्यासाठी अपलोड करणेसाठी आवश्यक कागदपत्राची यादी

1. उमेदवाराने TAIT 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेले छायाचित्र अथवा अद्ययावत छायाचित्र.

2. उमेदवाराने TAIT 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेली स्वाक्षरी अथवा अद्ययावत स्वाक्षरी.

3. महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate).

4. जातीचा दाखला / जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

5. जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)

6. समांतर आरक्षणासाठी

A) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)

B) माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)

C) पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र (लागू असल्यास)

वाचा   या वर्षी २०२३ -२४ केव्हां पासून असेल उन्हाळी सुट्टी ? जाणून घ्या|When will summer vacation start this year 2023-24 in maraharahtra? find out

D) प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)

E) भूकंपग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)

F) प्राविण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबतचे बाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केल्याची पोचपावती (लागू असल्यास)

G) अनाथ असल्याचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)

7. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका.

8. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका.

9. शैक्षणिक अर्हताबाबत पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास)

10. शैक्षणिक अर्हताबाबत पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका ( लागू असल्यास)

11. पदविका स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत डीएड / डीटीएड / डीएलएड / टीसीएच इ. बाबतचे पदविका

प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास).

12. पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत बीएड / बीएएलएड/बीएससीएड/बीपीएड/बीपीई इ. बाबतचे पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास).

13. पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत एमपीड इ. बाबतचे पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र

व गुणपत्रिका (लागू असल्यास).

14. बीपीएड उमेदवारांकडे इतर शैक्षणिक अर्हता व प्रमाणपत्र असल्यास तशी प्रमाणपत्रे (लागू

असल्यास).

15. शिक्षक पात्रता परीक्षा ( राज्य / केंद्र ) अर्हताबाबत प्रमाणपत्र ( लागू असल्यास).

16. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र (लागू असल्यास) 17. स्वातंत्र्य सैनिकाचा वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)

18. 1991 चे जनगणना कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)

19. 1994 चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)

टीप- 1. छायाचित्र व स्वाक्षरी ही .jpg/.jpeg या फॉरमॅटमध्ये कमाल 100 kb मर्यादेत साईज आवश्यक आहे.

2. इतर सर्व कागदपत्र/प्रमाणपत्राकरिता .pdf/.jpg/.jpeg या फॉरमॅटमध्ये कमाल 500kb मर्यादेत साईज आवश्यक आहे.