बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यास ‘या’ तारखेपासून सुरुवात

55

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या 9 ऑक्‍टोबरपासून सुरू केली जाणार आहे.राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा दि. 1 ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे.आता मंडळाकडून इयत्ता बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. नियमित शुल्कासह अर्ज करण्यासाठी दि. 9 ऑक्‍टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधी देण्यात आली. परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच अर्ज भरावेत, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.