कंत्राटीकरण व खाजगीकरण शासन निर्णय बाबत शासनाच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा मुल – कंत्राटी पद्धतीने पदभरतीचा शासकीय जीआर रद्द करा महाराष्ट्र सरकारने शिक्षण विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती विभाग आदी ठिकाणी शासकीय पदभरती कंत्राटी पद्धतीने भरतीचा काढलेला जी.आर. रद्द करण्यात यावा, दि.6 सप्टेंबर 2023 रोजी कंत्राटी तत्वावर नौकरी भरती संदर्भात काढलेला शासन जी.आर तात्काळ रद् करावे,राज्यातील 62,000 सरकारी शाळांचे होणारे खाजगीकरण पूर्णपणे रदद् करावे,20पटसंख्येच्या आतील जि.प.शाळा बंद करण्याचा निर्णय रदद् करावे, बेरोजगारांना 5000 रूपये प्रति महिना बेरोजगारी भत्ता देण्यात यावे,सर्व समुदायाची जातनिहाय जगनणना तात्काळ करण्यात यावी,शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यात यावे. या सर्व मागण्यांकरिता गुजरी चैाक ते तहसिल कार्यालय मूल बुधवार दिनांक 11 आॅक्टोबर 2023 विनीत तथा आयोजक कंत्राटीकरण व खाजगाीकरण विरोधी जन आक्रोश समिती,मूल तालूका यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. तहसिलदार डाॅ.रविंन्द्र होळी तहसील कार्यालय मूल मार्फत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले. मुल शहरातील तसेच तालुक्यातील जनता,सामाजिकसंघटना,विद्यार्थी , युवक व युवती, प्रतिष्ठीत व्यक्ती, शिक्षक राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी,लोकप्रतिनधी,पत्रकार मंडळी,ज्येष्ठ नागरीक, असंख्य महिला,नागरीक यांनी बहूसंख्येने मोर्चात सहभागी झाले होते. मुख्य रस्त्यावरून शासनाच्या विरोधात नारे देत आलेला मोर्चा तहसीलदार डॉ.होळी यांना निवेदन देण्यात आल्या असून आमच्या मागण्या त्वरित पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.