मुल@लाचखोर महिला दुयम निबंधक ACBच्या जाळ्यात; फुटले बिंग, काय घडलं?

88

मुल प्रतिनिधी

दुय्यम निबंधक श्रेणी-१ , मुल येथील श्रीमती वैशाली वैजनाथ मिटकरी, वय ४४ वर्ष, व्यवसाय नोकरी, पद-मुल्यांकन दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक कार्यालय चंद्रपूर प्रभारी दुय्यम निबंधक – श्रेणी -१, मुल जि. चंद्रपूर यांचे विरुद्ध १५,०००/- रूपये मागणी करून तडजोडीअंती १०,०००/- रू. स्विकारल्या संबंधाने अॅन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने आज रोजी कार्यवाही केली.यांना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.हजारांची लाच मागितलीलाच देण्यास नकार देत याबाबत लाचलुचप प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केलीएसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर -यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात सापळा लावून आ-दुय्यम निबंधक यांना १०,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरू आहे.जारांची लाच स्वीकारताना दुय्यम निबंधक यांना १०,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरू आहे.यांना रंगेहात पकडले. रात्री उशिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबीनेमिटकरीयांना अटक केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे मौजा मारोडा, ता. मुल, जि. चंद्रपूर येथील रहीवासी असुन दस्तलेखनाचे काम करतो. तकारदार यांचेकडे त्यांचे पक्षकार यांची मौजा मुल येथील शेत जमिन दुसन्या व्यक्तीचे नावे करायचे काम होते. त्यांकरीता दिनांक ११/१०/२०२३ रोजी तक्रारकर्ते हे पक्षकाराचे मौजा मुल येथील शेती संबंधी दस्त नोंदणीचे कागदपत्रे तयार करून दुय्यम निबंधक कार्यालय, मुल येथील गै. अ. श्रीमती वैशाली मिटकरी दुय्यम निबंधक यांचेकडे जाऊन दस्त तपासणी व शेत जमिनीचे मुल्यांकन काढुन दस्ताची मुद्रांक व नोंदणी फी बाबत विचारणा केली असता दुय्यम निबंधक श्रीमती मिटकरी मॅडम यांनी दस्त नोंदणीचे काम करून देण्याकरीता गैरअर्जदार यांना शासकीय शुल्का व्यतिरीक्त १५,०००/- रूपयांची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना गैरअर्जदार यांस लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली.
प्राप्त तकारीवरून आज दिनांक १२/१०/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत पाटील यानी तकारदाराने दिलेल्या तकारीची गोपनीयरित्या शहानिशा करून पडताळणी / सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये पडताळणी कार्यवाहीदरम्यान गै.अ. श्रीमती वैशाली मिटकरी दुयम निबंधक यांनी शेतीचे दस्त नोंदणी करण्याचे कामाकरीता तडजोडीअंती १०,०००/- रू लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून दुयम निबंधक कार्यालय मुल येथे पंचासमक्ष कार्यवाहीदरम्यान आ.लो.से. श्रीमती वैशाली वैजनाथ मिटकरी, मुल्यांकन दुय्यम निबंधक यांना १०,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरू आहे.
सदरची कार्यवाही श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. नागपूर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर तसेच श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, लाज वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोहवा. हिवराज नेवारे, पो.अ. वैभव गाडगे, अमोल सिडाम, म. पो.अ. पुष्पा काचोळे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर व चा. पो.अ. शामराव बिडगर मो. प. वि. चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली आहे. हॅश व्हॅल्यु घेण्यात आलेली आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्याच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यानी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यानी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा….
• श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर,
श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय नागपूर ०७१२-२५६१५२०