मूल:—तीन दिवसीय संपन्न झालेल्या आंतर-महाविघालयीन सांस्कृतीकयुवा महोत्सव
“इंद्रधनुष्य — २०२३ ” या स्पर्धेमध्ये तानवादयशास्त्रीय संगीत मध्ये बासरीवादन करून मूल येथील साहिल सुत्रपवार हा गोंडवाना विद्यापिठातुन प्रथम क्रमांक पटकावून अव्वल ठरला आहे. त्याची थेट राज्यस्तरावर निवड झाली आहे. सदर स्पर्धा विदयार्थी विकास विभागांतर्गतघेण्यात आल्या होत्या.
साहिल हा मूल येथील कर्मविर महाविद्यालयाचा बि. ए.फायनलचा विद्यार्थी असून पत्रकार धर्मेंद्र सूत्रपवार
यांचा सुपुत्र आहे.लहानपणापासूनच साहिलला कलेची आवड असून त्याने कुठलेही कलेचे प्रशिक्षण न घेता बासरी वादनात हातखंडाप्राप्त केला आहे. विशेष म्हणजेतो स्वःता घरी बासरी तयार करून स्पर्धेत वाजवीतो, बासरी वादनाच्या अनेक स्पर्धा त्याने गाजविल्या आहेत. आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्या नंतरसिनेस्टार सौरभ मेश्राम ,मुंबईयांच्या हस्ते साहिललापुष्पगुच्छ , पदक , प्रमाणपत्रदेउन गौरविण्यात आले .
यावेळीविद्यार्थी विकास प्रमुखप्रिया गेडाम , राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख श्याम खंडाळेश्री देवाजी तोफा जेष्ठ समाजसेवक लेखा मेंडा,तसेच विघापिठातील सर्व विदयार्थी व विधार्थीनी उपस्थित होते.विदयापिठातून अव्वल ठरल्यानंतरविदयापिठ,कर्मवीर महा.,गावकरी वमित्रमंडळी तर्फे त्याचे अभिनंदन होतआहे.