जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 जाहीर, परीक्षांचे प्रवेशपत्र लिंक सक्रीय…

60

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023
जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी भाग 4 च्या परीक्षांसाठी जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केले आहे. विविध संवर्गातील एकूण 19460 पदांसाठी जिल्हा परिषद भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. सध्या भाग 4 मध्ये 01 ते 06 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहेत. कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी(शिक्षण) आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. इतर पदाचे प्रवेशपत्र लवकरच जाहीर होणार आहे. आज या लेखात आपण जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक व प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे…. 

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 4
तारीख शिफ्ट व वेळ पदाचे नाव
01 नोव्हेंबर  2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) कनिष्ठ यांत्रिकी
शिफ्ट 2 (सकाळी 10) यांत्रिकी
शिफ्ट 3 (सायंकाळी 03) कनिष्ठ आरेखक
02 नोव्हेंबर  2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) विस्तार अधिकारी (शिक्षण)
शिफ्ट 2 (सकाळी 10) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
06 नोव्हेंबर  2023 शिफ्ट 3 (सायंकाळी 03) विस्तार अधिकारी (पंचायत)… 

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?
जिल्हा परिषद प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

सर्वप्रथम संबंधित जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.
आता तेथे जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये प्रवेशपत्र वर क्लिक करा
नवीन टॅब ओपन होईल.
तेथे जिल्हा परिषद भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
आता आपले जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा….