भाग्यश्री बेलसरेने केली लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण
मूल : येथील मुख्याध्यापक हरिहरबेलसरे यांची कन्या भाग्यश्री बेलसरे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग२०२२मध्येघेण्यात आलेल्या
पशु विकास अधिकारी गट अ परीक्षेतएकूण २९३ परीक्षार्थीमधून ओबीसी गटामधून ७ व्या क्रमांकावर उत्तीर्ण
झाली आहे.भाग्यश्री हिने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विहिरगाव मूल येथे तर वर्ग ५ ते १० वी पर्यंतचे शिक्षण नवभारत कन्याविद्यालय मूल येथे घेतले होते, हे विशेष.आई व वडील शिक्षक असल्याने शैक्षणिक वातावरणाचा प्रभाव पडला होता.त्यामुळे जिद्दीच्या जोरावर तिने यश प्राप्त केल्याचे भाग्यश्रीने बोलताना सांगितले.
Post Views: 128