नागपूरसाठी बस सेवा सुरु कराव्यात अशी प्रवासी नागरिकांची मागणी आहे .

66

मूल हे तालुक्याचे ठिकाण . चंद्रपूर जिल्ह्यातील केंद्रस्थानी असलेले शहर . गडचिरोली , भंडारा , तुमसर , ब्रम्हपुरी , गोंडपिपरी , पोंभूर्णा , यवतमाळ , वाशिम , उमरखेड , पुलगांव , आर्वी , वर्धा , नांदेड , नागपूर , अशा अनेक शहराशी मूल शहर प्रत्यक्ष माल वाहतुक आणि प्रवासी वाहतुकीशी जोडल्या गेले आहे .
मूल शहर तांदळाची मोठी बाजारपेठ म्हणूनही लौकिक आहे . अलिकडे भाजीपाल्याची ठोक बाजारपेठ म्हणून उदयास येते आहे .
शैक्षणिक क्षेत्रात प्रगतिपथावर असलेले शहर दररोज शेकडो विद्यार्थ्यांना बस वाहतुकीद्वारे शाळा आणि महाविद्यालयाशी जोडल्या गेलेले आहे .
अशा शहरातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मूल – नागपूर ही बस सेवा खंडित केलेली आहे .
सकाळी ९:४५ वाजता फक्त एकच बस नागपूरसाठी सुरु आहे . यामुळे अनेक प्रवासी नागरिकांची गैरसोय होते आहे . बस स्थानक तथा आगार प्रबंधकांनी पूर्ववत नागपूरसाठी बस सेवा सुरु कराव्यात अशी प्रवासी नागरिकांची मागणी आहे .