वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरीता नुकसान भरपाई मंजुरीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

61

आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही जिल्हे आहेत कि त्या जिल्यामध्ये वन्य प्राणी किंवा अन्य मार्गाने पिकाचे नुकसान होत असते. पण शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई कशी मिळवायची याची माहिती नसते, तसेच तक्रार कोठे करायची याचीही माहिती नसते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांचे नुकसान होत असते, हे नुकसान टाळण्यासाठी आपण या लेखामध्ये पिकाचे नुकसान झाल्यास त्याची तक्रार कोठे करायची, त्यासाठीचा अर्ज कसा करायचा, नुकसान भरपाई कशी मिळवायची, ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती पाहणार आहोत.
पीक नुकसानीची तक्रार तीन दिवसांत करावी :
जर आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर याची तक्रार अधिकार क्षेत्र असलेल नजीकचे वनरक्षक, वनपाल अथवा वन परिक्षेत्र अधिकारी यांच्यापैकी कोणाकडेही घटना घडल्यापासून तीन दिवसांत करावी.
पीक नुकसानीची शहानिशा:
पिकाचे जर नुकसान झाले आहे कि नाही याची शहानिशा संबंधीत वनरक्षक, कृषी सहाय्यक आणि तलाठी अशा तीन सदस्यांच्या समितीमार्फत १० दिवसाच्या आतमध्ये करण्यात येते. हि शहानिशा पिकाचे नुकसान झालेल्या जागेवर जाऊन करण्यात येते. हि समिती पंचनामा करणे, नुकसान क्षेत्राची मोजणी करणे, प्रावे तपासणे व नुकसानीचे मूल्य ठरविणे हे या समितीकडून कामे केली जातात. तसेच शेतकऱ्यांनी जर आपल्या पीक नुकसानीचा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस :
पीक नुकसानीचा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास प्रथम तुम्हाला खालील वनविभागाच्या वेबसाईट वर जायचे आहे.

त्यानंतर एक पेज ओपन होईल त्या पेजच्या वरती माहिती अधिकार / आरटीएस या पर्यायावर क्लिक करून आरटीएस सेवा (RTS) हा पर्याय निवडायचा आहे.
नंतर पब्लिक पोर्टल ओपन होईल त्यामध्ये तूम्हाला अनेक सेवा दिसतील त्यामधून तुम्हाला “वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरीता नुकसान भरपाई मंजुर करणे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
या पर्यायावरती क्लिक केल्यावर पुढील पेजवर तुम्हाला नुकसान भरपाईची माहिती भरायची आहे, यामध्ये शेतपिक या पर्यायामध्ये नुकसान भरपाईचा प्रकार टाकायचा आहे,
नंतर अर्जदाराचे पूर्ण नाव, मोबाइल नंबर, नुकसानीचा प्रकार ( ऊस पीक) यामधील पर्याय निवडायचा आहे. नंतर शेतकऱ्याचे नाव, जिल्हा, तालुका, तुमच्या जवळील कार्यालयाचे नाव, पत्ता व ज्या दिवशी घटना घडली तो दिनांक टाकून ऍड (Add) या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.