मूल:चंद्रपूर वरून गडचिरोलीला भाऊबीजेला दुचाकीने जात असताना मार्गावरील खड्डा चुकविण्याचा नादात पतीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने खाली पडले असता समोरुन येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या मागील चकात पत्नी आल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजता दरम्यान मुल-चंद्रपूर मार्गावरील आगडी जवळ घडली.
सुरेखा जितेंद्र गोन्नाडे (३७)वर्षे रा.बंगाली कॅम्प इडस्ट्रील एरिया चंद्रपूर असे मृत महीलेचे नाव आहे.पती जितेंद्र पुंडलिक गोन्नाडे (३८)पत्नी सुरेखा जितेंद्र गोन्नाडे, मुलगी आकांशा जितेंद्र गोन्नाडे (१३)मुलगा रयन जितेंद्र गोन्नाडे (८)दुचाकी (क्रमांक एम.एच- ३४ बी.डब्ल्यू – ३७८४) होंडा शाईन गाडी घेऊन चंद्रपूर वरून गडचिरोलीला भाऊबीजेकरिता जात होते.मात्र जात असताना रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात पतीचे गाडीवरील नियंत्रण सुटले.दरम्यान दुचाकी घेऊन सर्वजण खाली पडले.
अशातच विरुद्ध दिशेने मुलं वरून चंद्रपूर कडे येणारी खाजगी प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स एम.एच-१५ ए.के-१६९८ ट्रॅव्हलच्या मागील चाकात पत्नी आल्याने तिच्या डोक्याचा पूर्ण चेंदामेंदा होऊन घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला तर पती किरकोळ जखमी झाला.मात्र सुदैवाने दोन्ही मुले बालबाल बचावले.घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह शविच्छेदनासाठी मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.