बिरसा मुंडाचा लढा सामान्य जनतेच्या न्यायासाठी ….. डॉ.अभिलाषा बेहरे, गावतुरे

73

भारताच्या स्वातंत्रलढ्यात आदिवासी शहिदवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अग्रेसर होते .बिरसा मुंडाचे उलगुलांन म्हणजे सामान्य जनतेच्या विद्रोहाचे प्रतीक होते. त्यामुळेच समस्त बहुजन समाजाचे ते आदर्श आहेत असे प्रतिपादन जननायक बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती मूल च्या वतीने कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलतांना केले.

*यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक वासुदेव आत्राम ,उदघाटक म्हणून समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष, प्रा. विजय लोनबले , प्रमुख मार्गदर्शक डॉ.समीर कदम तसेच मुख्य अतिथी डॉ. राकेश गावतुरे, साहित्यिक प्रब्रम्हानंद मडावी, मुकेश गेडाम, समाज सेविका प्रियंका गेडाम. अशोक येरमे यांचीही समायोचित भाषणे झाली.

कार्यक्रमाची सुरुवात गुजरी चौक गोटूल येथील सल्ला-शक्ती स्थळाची पारंपरिक पूजा करून भव्य रॅली वाजागाज्यात व आदिवासी सांस्कृतिक नृत्य करीत बिरसा मुंडा अमर रहे, बिरसा तेरी शान मे निकले हम मैदान मे अशा घोषणा देत, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मालारपण करीत आदिवासी समाजातील युवक मिथलेश गेडाम, महेश अत्राम,राकेश कन्नाके, वैभव सोयाम, योगेश सिडाम, गौरव सीडाम, जयंत कोडपे, अकश मट्टे , सूरज मडावी, यांचे नेतृत्वात कन्नमवार सभागृहापर्यंत काढण्यात आली.

रालीचे रूपांतर सभेमध्ये करण्यात येऊन कन्नमवार सभगृहत समाज प्रबोधन कार्यक्रम पार पडले. समाजातील महिलांनी स्वागतगीत तर चिदानंद सीडाम आणि गौरव सिडाम यांनी वंदन गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.कार्यक्रमाचे संचलन अरविंद मेश्राम तर आभार तेजस मडावी यांनी मानले.

*कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,मिथिलेश गेडाम,यश मडावी,मुकेश कनाके,नितीन कनाके, महेश आत्राम,गौरव सीडाम,राकेश कनाके, महेश आत्राम, सुभाष टेकाम, अनंत कोडापे, वामन कोडापे, विकी कुमरे तसेच बिरसा मुंडा बचत गट,राणी हिराई गट इत्यादींनी सहकार्य केले.