नागपूरमध्ये किल्ले चंद्रपुरची हुबेहूब प्रतिकृती साकारली

69

नागपूर, १७ नोव्हेंबर २०२३: तेजस आकर्ते, तेजस कोडापे, शिव कायरवार, कान्हा वासनकर व समुहाच्या पुढाकाराने शिवछत्र प्रतिष्ठान निर्मित काल्पनिक किल्ला किल्लेचंद्रपुर नागपूर येथे भरविण्यात आले आहे. यात चंद्रपुरातील गोंडकालीन किल्ला, महाकालीमंदिर, राणी हिराइ आणि राजे बिरशाह यांची समाधी आणि सर्व ऐतिहासिक परिसर हुबेहूब आणि वस्तुनिष्ठ साकारला आहे. तेजस आकर्ते हे मुख्य कलाकार करून ते नागपूर येथील तुकडोजी चौक येथे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनात किल्लेचंद्रपुरच्या किल्ल्याचे प्रवेशद्वार, बुरुज, दरवाजे, महाकाली मंदिरातील मूर्ती, राणी हिराइ आणि राजे बिरशाह यांची समाधी या सर्व गोष्टी हुबेहूब साकारल्या आहेत. या प्रदर्शनामुळे चंद्रपुरातील ऐतिहासिक वारसा जतन होण्यास मदत होईल. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या कामाचं कौतुक केलं आहे.

या प्रदर्शनाबाबत तेजस आकर्ते म्हणाले, “चंद्रपुर हा गोंडकालीन इतिहासाचा एक महत्त्वाचा वारसा आहे. या वारशाला जतन करण्यासाठी आम्ही हे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनामुळे चंद्रपुरच्या ऐतिहासिक वारसाबद्दल जागरूकता निर्माण होईल, अशी आशा आहे.. दरम्यान, राजे मुधोजी भोसले यांनी किल्ले चंद्रपुरला सदिच्छा भेट देऊन पुजन केल. व उपस्थित शिवभक्तानां शुभेच्छा दिल्या.