तहसीलदार डॉ.रविंद्र होळी यांनी दिले पंचनामे सादर करण्याचे निर्देश

87

क्रमांक कावि/अका/कानुनगो/2023/903
दिनांक :- 28/11/2023
वाचा :- महाराष्ट्र शासन, महसुल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय
मुबंई याचे पत्र क्रमांक सीएलएस-2023/प्र.क्र.260/म-03, दि. 28/11/2023

                                                       :- आदेश -:
दिनांक 26 ते 28 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत आलेल्या अवेळी पाडुस / वादळीवारे / गारपिटीमुळे शेतपिकांचे नुकसान झालेले असल्याने महसुल विभाग, कृषी विभाग व ग्रामविकास विभाग यांनी तात्काळ सयुक्तं पंचनामे तयार करुन अहवाल सादर करण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहे.
करीता आपल्या क्षेत्राअतंर्गत येत असलेल्या अधिनस्त गावात दिनांक 26 ते 28 नोव्हेबर, 2023 या कालावधीत आलेल्या अवेळी पाउस/वादळीवारे / गारपिटीमुळे शेतपिकांचे नुकसान झालेले असलयास नुकसान झालेल्या शेतपिकाचे गावनिहाय सयुक्तं पंचनामे तयार करण्याकरीता त्रिस्तरीय समिती यांचे खालील प्रमाणे नियुक्ती करण्यात येत आहे.
नेमुन देण्यात आलेली कामे  त्रिस्तरीय नियुक्त कर्मचारी   नियत्रंण अधिकारीदिनांक 26 ते 28 नोव्हेबर, 2023 या कालावधीत आलेल्या अवेळी पाडुस/वादळीवारे/गारपिटीमुळे शेत पिकांचे गावनिहाय पंचनामे तयार करणे
1. सर्व तलाठी1 मंडळ अधिकारी2. सर्व कृषी सहाययक 3. सर्व ग्रामसेवक2. कृषी विस्तार अधकारी3. विस्तार अधिकारी(ग्रामपंचायत)वरीलप्रमाणे प्रत्येक नियुक्त त्रिस्तरीय कर्मचारी ( तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाययक) यांनी आपल्या अधिनस्त येणा-या गावात प्रत्यक्ष भेट देवुन मौका चौकशी करुन गावनिहाय खातेदारनिहाय शेतपिकांचे सयुक्तं पंचनामे सादर करावयाची आहे.

   सदर माहिती खालील दिलेल्या विवरणपत्रानुसार सयुंक्त स्वाक्षरीने दिनांक 30/11/2023 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सादर करावयाची आहे. नेमुन दिलेल्या कामात कोणत्याही प्रकरची हयगय होता कामा नये या कामास प्रथम प्राधान्य देण्यात यावे.

अन्यथा आपल्यावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याबाबत नोंद घ्यावी. ( तसेच शेतक-यांचे / नुकसानग्रस्ताचे बॅक निहाय अचुक खाते क्रमांक IFSC Code सहित नोंदवून बँक खातेची Hard Copy व Soft Copy कानुनगो शाखेत सादर करावी)तालुका कृषी अधिकारी   मुल  गट विकास  पंचायत समिती मुल  तहसिलदार, मुल