सुशी दाबगावं येथे घराचे बंद कुलूप तोडून चोरी@घराशेजारी असलेले आशीर्वाद नाटक बघायला गेले होते पती- पत्नी

46
मुल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील येथील श्रावण केशव देउरमले यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी अल्मारीतून ९०,००० हजार रुपयाची रोख रक्कम रूपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे.ही घटना सोमवार ला रात्री 2 वाजताच्या सुमारास लक्षात आली ता.११ डिसेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत चिरोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिरोली पोलिस चौकी अंतर्गत येत असलेल्य सुशी दाबगावं येथे श्रावण केशव देऊरमले हे बस स्थानक परिसरात राहात आहे. सोमवारी रात्री गावात व घरा शेजारीच आशीर्वाद या नाट्य प्रयोगाचे प्रयोग पाहण्यासाठी शेतकरी पती पत्नी गेले होतो दरम्यान संधी साधत चोरट्यांनी सादर शेतकऱ्याचे नुकतच धान चुरून विकलेले सर्व रुपये अज्ञात चोरट्याने देउरमाले यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि कपाट उघडून कपाटातील लाल पर्स मधील ६९,००० , पणीत असलेले १५,००० , ९,००० पिशवीतील आणि ७,००० डब्यातून असा एकूण ९०,००० हजार रुपये चा मुद्देमाल चोरून चोरट्याने पोबारा केला आहे.

याप्रकरणी देऊरमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चीरोली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध प्रतामिक भादवी कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी सुशी दाबगावं परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला असून अनेक शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारीही चोरून नेल्या आहेत. त्यामुळे शेतकरीही वैतागले आहेत. त्यातच आता दिवसा ढवळ्या चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ९०,००० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून पोबारा केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.