मातृवंदन योजनेचा लाभ घेतला का?

56

मातृवंदन योजनेचा लाभ घेतला का? प्रधानमंत्री मातृवंदन योजना

भारतातील दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणात शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. तसेच प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी तात्काळ काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्याचे व त्याच्या नवजात बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे देशाच्या मातामृत्यू व बालमृत्यू दरात वाढ होते. या कारणामुळे मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदन योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यामध्ये पहिल्या जीवित अपत्या (मुलगा / मुलगी) करिता पाच हजार रुपयांचा लाभ लाभार्थीला दोन टप्प्यांत दिला जातो. यामध्ये दुसरे जीवित अपत्ये फक्त मुलीसाठी एकाच टप्प्यात सहा हजार रुपयांचा लाभ लाभार्थीला दिला जात आहे. मात्र याकरिता बाळाचा जन्म १ एप्रिल २०२२ नंतरचे असायला पाहिजे.
या योजनेचा लाभ घेण्याकरिता आ इपल्या जवळच्या आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य सेविका यांच्याशी संपर्क करून आपले प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत ऑनलाइन फार्म भरून नोंदणी करावी. जिल्ह्यातील सर्व पात्र गरोदर माता प्रधानमंत्री मातृवंदन योजनेपासून वंचित राहू नये. 

| योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता
■ लाभार्थीचे कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रुपये ८ लाखांपेक्षा कमी पाहिजे.
■ अनुसूचित जाती/जमातीच्या महिला.
■ दरिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारक महिला.
■ ई श्रम कार्डधारक महिला.
■ मनरेगा जॉब कार्डधारक महिला.
■ दिव्यांग महिला ४० टक्के किंवा पूर्ण दिव्यांग.
■ किसान सन्मान निधी महिला शेतकरी.
■ अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत शिधापत्रिकाधारक महिला.
■ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्डधारक महिला.