मूल दर्पण कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

64

मुल तालुक्यातील बातम्यांचा आढावा घेणार्‍या मूल दर्पण न्यूज चैनल चे कार्यालयाचा उद्घाटन सोहळा ज्येष्ठ पत्रकार विजय सिद्धावार यांचे असते आज करण्यात आला.
यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष दीपक देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार दे धक्का चे संपादक भोजराज गोवर्धन, वाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार, प्रेस क्लबचे पदाधिकारी धर्मेंद्र सूत्रपवार, सतीश राजूरवार, राजेंद्र वाढई,नितेश म्याकलवार उपस्थित होते.
मूल तालुक्यातील ताज्या घडामोडी मूल दर्पणच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आपला संकल्प असल्याचे मत यावेळी मुख्य संपादक कुमुदिनी भोयर यांनी व्यक्त केले.
फीत कापून आणि प्रतिमेचे पूजन करून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित पत्रकारांनी कुमुदिनी भोयर यांना व मूल दर्पण चॅनेल ला शुभेच्छा दिल्या.