मूल तहसिल समोर@अंगणवाडी सेविका प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी

107

मूल, ता. २६: अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू करावे यासह अन्य मागण्यांना घेऊन मागील 23 दिवसापासून महिला रस्त्यावर आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार या महिलांनी केला आहे. संपाच्या २३ व्या दिवशी  सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेमधील २५ एप्रिल रोजी ग्रॅच्युइटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारी वेतनश्रेणी, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षेचा लाभ द्यावा. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना तत्काळ मानधनवाढ जाहीर करावी. मदतनीस व सेविकांचेमानधन किमान १८ हजार ते २६ हजारापर्यंत करावे. मानधन महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी निर्देशांकानुसार वाढ करावी. नगरपालिका हद्दीत जागेचे निकषशिथिल करून अंगणवाड्यांसाठी ५ हजार ते ८ हजार भाडे मंजूर करावे. शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अंगणवाडी कार्यकर्ते विमा योजना तत्काळ लागू करावी तसेच मृत पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये द्यावेत आदी विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

४ डिसेंबरपासून राज्यातील  अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू करावे यासह अन्य मागण्यांना घेऊन मागील 23 दिवसापासून महिला रस्त्यावर आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार या महिलांनी केला आहे.

यावेळी किशोर जामदार, भेलके यांनीही मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात राजेश पिंजरकर, शारदा लेनगुरे, प्रमोद गोडघाटे, विद्या निव्रड, सुशीला कर्णेवार, गुजा डोंगे, वर्षा तिजारे, मोनाली जांभुळे, कुंदा वाघमारे, ललिता चौधरी, मनीषा दयालवार, मंगला झाडे यांच्यासह अंगणवाडीसेविका सहभागी झाल्या होत्या.