आज ऑनलाइन रोजगार मेळावा @पंडित दीनदयाल उपाध्याय -आयुक्त भैय्याजी येरमे

75

चंद्रपूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगारमेळाव्यात सहभाग घेण्याकरिताउमेदवारांनीमहास्वयम यासंकेतस्थळावर नोंदणी करावी.

चंद्रपूर जिल्ह्याची निवड करून फिल्टर बटनावर क्लिक करावी. नंतर अॅक्शन मेनुतील दुसऱ्या बटनावरील व्हॅकन्सी लिस्टिींग यावर क्लिक करून आय अॅग्री हा पर्याय निवडावा.

त्यानंतर आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या आस्थापना/ कंपन्यांच्या रिक्त पदांसाठी अप्लाय करावे. उद्योजकांसोबत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधून ऑनलाइन मुलाखती द्याव्या व ऑनलाइन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.