दुर्दैवी घटना! मूल-जानाळा मार्गावरील अपघात; एकाचा जागीच मृत्यू

103

दुचाकी- पीकअप 

मूल : भरधाव दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या छोट्या पीकअप वाहनाला जोरदार धडक बसल्याची घटना मूल चंद्रपूर मार्गावरील जानाळा जवळ शुक्रवारी रात्री ६.३० वाजताच्या सुमारास घडली. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील दुसरा युवक गंभीर जखमी झाला. क्रिष्णा धरमपुरवार (२५) रा. विरवा तालुका सिंदेवाही असे मृत युवकाचे नाव आहे. तर समीर बंडुजी कोवे (२२) रा. डोंगरगाव ता. मूल गंभीर जखमी आहे.
क्रिष्णा व समीर हे चंद्रपूर वरून मूल मार्गाने एम.एच-३४ ए. एक्स- १६२६ या दुचाकीने गावाला जात होते. मूलवरून चंद्रपूरकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या छोटा पीकअप क्रमांक एम.एच-३४ बी. झेड – १२६४ ला दुचाकीची धडक बसली. धडक इतकी जोरदार बसली की दुचाकीचालक जागीच ठार झाला. तर सोबतचा युवक गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मूल पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
पुढील तपास पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलिस करीत आहे. या मार्गावर अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले.