कर्मवीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना +2 च्या वार्षिक शिबिराचा समारोप समारंभ झाला.
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कर्मवीर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना +2 चे विशेष ग्रामीण शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उसराळा येथे पार पडले.
जलव्यवस्थापन, ग्रामस्वच्छता आणि व्यक्तिमत्व शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव एड. अनिल वैरागडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोपीय कार्यक्रमात प्राचार्य डॉ.अनिता वाळके, पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर, सरपंच प्रियांका नरमलवार, प्रा. चंद्रकांत मणियार, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश नेवारे, राजेंद्र कोवे, तुकाराम मशाखेत्री, व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
विकास या विषयावर आधारित या शिबिराचा समारोप 31 डिसेंबर 2023 रोजी झाला.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. ए आर शेलेकर यांनी ठेवले. या शिबिर कालावधीत बंधारा बांधण्याचे काम रासाच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून केले. दुपारच्या सत्रात व्यसनमुक्ती व तरुणांची मानसिकता या विषयावर प्रा. चंद्रकांत मणियार यांनी मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रमात सरपंच प्रियांका नरमलवार, प्राचार्य डॉ.अनिता वाळके, प्रा. चंद्रकांत मणियार यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट सांगताना विद्यार्थ्यांना जीवनात कठोर परिश्रम करून सकारात्मक विचार करून पुढे जाण्याचा सल्ला दिला.
एड. वैरागडे यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची जबाबदारी पार पाडावी असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून आत्मसात केलेले चांगले संस्कार जीवनात आत्मसात करणे गरजेचे आहे.
याप्रसंगी तनुजा भोयर, श्रमिक निकोडे, अर्पिता कडूकर, शीतल चौहान, वेदांत सोनुले या विद्यार्थिनींनीही मनोगत व्यक्त केले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन सोनाली अस्वाल यांनी केले तर आभार प्रदर्शन संजीवनी मडावी यांनी केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनात प्राचार्य डॉ.वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल शेलेकर, प्रा.राहुल बोडखे आदी प्राध्यापकांनी सहकार्य केले.