विदयार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे-तहसिलदार डॉ.रविंद्र होळी

56

अपयशाने खचून जाऊ नका,अभ्यासात सातत्य ठेवा – मान्यवर अधिकारी वर्गांचा सूर
मूल:- विदयार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे.त्यातून आनंद भेटतो. यशासाठी ध्येय, चिकाटी आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे.त्यासाठी भरपूर मेहनतीची सुदधा विदयार्थ्यांनी तयारी ठेवावी, असे प्रतिपादन तहसिलदार डॉ.रविंद्र होळी यांनी व्यक्त केले. येथिल कर्मवीर महाविदयालयाच्या सभागृहात मूल तालुका पत्रकार संघ आणि कर्मवीर महाविदयालय,मूल यांच्या संयुक्त विदयमाने 15 जानेवारी रोजी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार डॉ.रविंद्र होळी हे होते.त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून नायब तहसिलदार तथा प्रभारी मूल नगर पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत पवार,मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी बी.एस.राठोड,पोलिस निरिक्षक सुमित परतेकी,नायब तहसिलदार औमकार ठाकरे,कर्मवीर महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ.अनिता वाळके,मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम यांची प्रमूख उपस्थिती होती. तहसिलदार डॉ.होळी पुढे म्हणाले,विदयार्थ्यांनी कोणतेही काम मन लावून करावे.स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अभ्यासातील बारिकसारिक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.काय वाचायचे आणि काय नाही हे विदयार्थ्यांना समजले पाहिजे.तसेच सोशल मिडीयाचा वापर कमी करावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.वेगवेगळी उदाहरणे देत त्यांनी विदयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.अपयशाने खचून न जाता स्पर्धा परिक्षांना सामोरे गेले पाहिजे.संघर्ष करा आणि जीवन घडवा.अभ्यासात सातत्य ठेवा.यश निश्चित तुमच्या पदरात पडेल असा आशावाद नायब तहसिदार तथा मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी व्यक्त केला. आपले करिअर घडवितांना आणि स्पर्धा परिक्षेसाठी वर्तमानपत्राचे महत्व अनन्यसाधारण आहे.ध्येय ठरविले गेले पाहिजे.असे मत संवर्ग विकास अधिकारी बी.एस.राठोड यांनी व्यक्त केले.अभ्यासात सातत्य ठेवण्याचे आवाहन पोलिस निरिक्षक सुमित परतेकी यांनी केले.क्षेत्र कोणतेही असू दया,प्रत्येक क्षेत्रात करिअर करता येते.त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्यााचे मत प्राचार्या डॉ.अनिता वाळके यांनी व्यक्त केले.स्पर्धा परिक्षेत यश संपादन करून अधिकारी होण्याची जिदद विदयार्थ्यांनी बाळगली पाहिजे असे मत नायब तहसिलदा औमकार ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. करिअर मार्गदर्शन कार्यक्रमा मागची पार्श्वभूमी अध्यक्ष राजू गेडाम यांनी विशद केली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मालार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन सचिव विनायक रेकलवार यांनी केले.तर आभार उपाध्यक्ष युवराज चावरे यांनी मानले. सरस्वती स्तवन अशोक येरमे यांनी सादर केले. पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य प्रा.चंद्रकांत मनियार,दीपक देशपांडे,अशोक येरमे,प्रा.दहिवले,प्रा.लेनगूरे,प्रा.चन्ने,प्रा.डॉ.कराडे,प्रा.शेलोकर,प्रा.आगलावे,प्रा.उपरे,प्रा.बनकर,प्राध्यापिका हांडेकर,विदयार्थी,विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.