लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा -संजय पवार निवासी उपजिल्हाधिकारी

60

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत अपील मॉड्यूल प्रशिक्षण दरम्यान दिल्या सूचना
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे. या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना सुलभ व काल मर्यादित ऑनलाइन सेवा उपलब्ध करून द्यावा अश्या सूचना नियोजन भवन चंद्रपूर येथे दि.१८ जानेवारी रोजी आयोजित जिल्ह्यातील सर्व विभागातील प्रथम व द्वितीय अपील अधिकारी यांना निवासी उपजिल्हाधिकारी श्री संजय पवार यांनी अपील मॉडेल प्रशिक्षणा दरम्यान दिल्या. तसेच प्रत्येक विभागातील देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यात आला या बैठकीला जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, अधिसूचित सेवाचे प्रथम व द्वितीय अपील अधिकारी उपस्थित होते.
लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत नागरिकांची कामे जलद गतीने करण्यात यावे प्रत्येक विभागाने आपल्या कार्यालयात दर्शनी भागात सेवा अधिनियम बाबत तसेच देण्यात येणाऱ्या अधिसूचित सेवाबाबतचा फलक लावण्याबाबत कळविले. शासनाने आपले सरकार पोर्टलवर 37 विभागांच्या 511 सेवा अधिसूचित केलेल्या असून त्यांचा नागरिक ऑनलाईन लाभ घेऊ शकतात अधिसूचित सेवा नागरिकांना वेळेवर दिल्या जात आहेत किंवा नाही यासंदर्भात सुधारणा होण्यासाठी लोकसेवा आयोग गठीत करण्यात आलेला आहे नागरिकांना विहित काल मर्यादित सेवां न मिळाल्यास,नामंजूर झाल्यास आता ते सेवांकरिता आपले सरकार सेवा केंद्र व आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाइन अपील करू शकतात ह्या अपिलांवर प्रथम व द्वितीय अपील अधिकारी कार्यवाही करतील व कार्यवाहीत समाधान न झाल्यास अर्जदारास तृतीय व अंतिम अपील मा.राज्यसेवा हक्क आयुक्त नागपूर विभाग यांच्याकडे करता येईल व लोकसेवा हक्क अधिनियमानुसार कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती दिली यावेळी जिल्हा समन्वयक महा आय टी. जिल्हाधिकारी कार्यालय श्री. विकास लालसरे यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना आपले सरकार अपील मॉड्यूल बीटा वर्जन बाबत सविस्तर प्रशिक्षण दिले.