ग्रामीण भागात महिलांचे घुटका खाण्याचे प्रमाण वाढणे चिंताजनक !

58

मूल :-
तंबाकूजन्य पदार्थाचे विक्री करण्यावर शासनाने बंदी घातली असली तरी बेधडकपणे विक्री केली जात आहे. त्यामुळे तंबाकुचे सेवन करण्याचे दिवसागणिक वाढतच असल्याचे दिसुन येत आहे. यात ग्रामीण भागात घुटका खाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुख कॅन्सर होण्याची शक्यता बळावली असून महिलांचे घुटका खाण्याचा प्रकार भविष्यात चिंताजनक ठरु पाहात आहे. यासाठी खास महिलांना प्रबोधन होणे आवश्यक झाले आहे.
चूल आणि मूल एवढेच सिमीत असणाऱ्या महिला आजच्या स्थितीत विविध क्षेत्रात विविध पदावर आरूढ होत आहेत. शहरी महिलांच्या बरोबरीने ग्रामीण महिला देखिल सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन सक्षम होताना दिसत असली तरी घुटक्याच्या सेवनाने त्यांचें आयुष्य टांगणीला लागले असल्याचे वास्तव्य चित्र मूल तालुक्याबरोबराच अख्या चंद्रपूर जिल्ह्यात दिसत आहे. मूल तालुक्याचा विचार केल्यास तालुक्याची लोकसंख्या ८९,१६२ आहे. यात महिलांची संख्या जवळ्पास ४२, १५० आहे. आजच्या स्थितीत ग्रामीण भागात वार्ड तिथे पानठेला अशी स्थिती आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिला जास्त प्रमाणात असल्याने कामात उत्साह राहावा यासाठी या घुटक्याच्या आहारी गेल्याचे बोलल्या जात आहे. माञ या तंबाकू जन्य पदार्थाच्या सेवनाने मुख कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे मात्र याची चुणूकही लागली नसल्याने बेसुमारपणे घुटक्याचे सेवन सुरू आहे. कुंटुबाला आधार देणारी अशी ओळख असलेल्या या महिला कॅन्सरच्या विळख्यात ओढली जात असल्याने समाजप्रबोधन होणे गरजेचे झाले आहे. कॅन्सर सारख्या जीवघेण्या खेळातून बाहेर पडण्यासाठी शासनाबरोबरच सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने अनेक महिलांचे आरोग्य सुधारु शकते. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.
डॉ. सुमेध खोब्रागडे तालुका वैद्यकीय अधिकारी मूल:-
तंबाकू जन्य पदार्थाचे सेवन करणे मानवी शरीराला घातक आहे. त्यामुळे मुखाचे कॅन्सर होण्याची शक्यता असते. घुटका सारख्या पदार्थाचे सेवन विशेषतः महिलांनी सेवन करू नये. याबाबत जिल्हा परीषद चंद्रपूरच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रबोधन केले जात आहे.