निमगाव येथे पशुचिकित्सा कृती व मार्गदर्शन शिबीर

44

पशुसंवर्धन विभाग, पस सावली, ग्रामपंचायत व अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने पशुवैद्यकीय दवाखाना निमगाव येथे पशुचिकित्सा कृती व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले
शिबीराचे उद्घाटन सरपंच सौ गिताताई लंकेश लाकडे यानी केले अध्यक्षस्थानी उपसरपंच राजु पा ठाकरे होते प्रमुख अतिथी अध्यक्ष प्रभाकर राऊत,सचिव किशोर खेडेकर, लंंकेेश लाकडे,अरूण बारसागडे, तंटामुक्त अध्यक्ष ताराचंद सोनुले,सहा पविअ निमगाव डॉ बंडू आकनुरवार,डॉ वासनिक,गुलाब महाराज, फाले महाराज, सुुरेेश शेरकी, काशीनाथ मोहुर्ले होते.प्रथम गोमातेची पुजा करण्यात आली.यावेळी डॉ बंडू आकनुरवार यांनी पशुसंवर्धनाच्या विविध योजना,किसान क्रेडिट कार्ड,राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेबद्दल माहीती देण्यात आली.पसचे पविअ डॉ कापगते यांनी शिबीराला भेट देऊन पाहणी केली.शिबिरामध्ये औषधोपचार, लसीकरण, गर्भ व वंधत्व तपासणी,जंतोपचार,लहान शस्त्रक्रिया करण्यात आले.
शिबीर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरूडकर, संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनिक यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येऊन सहा पविअ डॉ बंडू आकनुरवार,डाॅ. वासनिक, कर्मचारी रवींद्र रामटेके, उध्दव पेदुरवार,धर्मा भोयर,ज्ञानेश्रर लाटकर व गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेण्यात आले.

शब्दांकन- डॉ बंडू आकनुरवार
सपविअ,निमगाव