सीईटी अर्ज भरण्याकरिता द्वितीय मुदतवाढ (२०२४-२५)

58

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षांकरिता उमेदवारांच्या नोंदणी डाटाची तपासणी केली असता अनेक उमेदवारांचे अर्ज अपूर्ण असल्याचे आढळून आलेले आहेत. तसेच अनेक उमेदवार व पालकांकडून CET अर्ज भरण्याच्या दिनांकास मुदतवाढ मळावी यासाठी विनंती या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून ऑनलाईन CET परीक्षेकरिता नोंदणीस द्वितीय मुदतवाढ खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार देण्यात येत आहे.
• दिनांक १२/०२/२०२४ नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. सदर परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mahacet.org उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधित विद्यार्थी / पालक यांनी कृपया नोंद घ्यावी.

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या सीईटी अर्जास  मुदतवाढ
 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष सीईटी सेलच्या वतीने विधी, एमबीए, बीएड, बीपीएड, एमआर्च. बी डिझाइन आदी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या प्रवेशपूर्व परीक्षा सीईटीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षांकरिता उमेदवारांच्या नोंदणी डाटाची तपासणी केली असता अनेक उमेदवारांचे अर्ज अपूर्ण असल्याचे आढळून आलेले आहेत. तसेच अनेक उमेदवार आणि पालकांनी सीईटी अर्ज भरण्यास विलंब झाल्यामुळे मुदतवाढ मिळावी, यासाठी कार्यालयास विनंती केली होती. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून राज्य सीईटी सेलच्या वतीने अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.