12 ते 21 फेब्रुवारी कालावधीत पी.एम.किसान योजनेअंतर्गत देशव्यापी संपृक्तता मोहीम

75

चंद्रपूर, दि. 13 : पी.एम.किसान योजनेअंतर्गत 12 ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सामायिक सुविधा केंद्रामार्फत दहा दिवसांची देशव्यापी संपृक्तता मोहीम राबविण्यात येत आहे.

सदर मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील केवळ ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित असल्याने योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्यामार्फत ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करण्यात यावे.

जिल्हा नोडल अधिकारी, पी.एम.किसान तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सामाईक सुविधा केंद्रामार्फत प्रलंबित लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सामाईक सुविधा केंद्राच्या अधिकाऱ्यांसह संबंधित सर्व यंत्रणाची बैठक आयोजित करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा पी.एम. किसान योजनेचे नोडल अधिकारी संजय पवार यांनी कळविले आहे.