उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

57
चंद्रपूर,दि.22 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.
ही आहेत शिबिराची स्थळे :
दि. 23 फेब्रवारी 2024 रोजी शासकीय विश्रामगृह वरोरा, 26 फेब्रवारी रोजी शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी, 27 फेब्रवारी रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर, 28 फेब्रवारी रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिपरी आणि 29 फेब्रवारी रोजी शासकीय विश्रामगृह, गडचांदुर या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याला दुपारी 1 वाजता शिबिराचे ऑनलाईन अपॉइंटमेंट कार्यालयामार्फत खुले करण्यात येईल याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी. असे कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.