महा-एमएचटी सीईटी 2024 मुदतवाढ जाहिर सूचना क्र 1

53

शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा मार्फत अभियांत्रिकी,औषधीनिर्माणशास्त्र,बी.प्लानिंग व कृषी तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाच्या प्रवेशा घेण्यात येणा-या एमएचटी सीईटी 2024 ही सामाईक प्रवेश परीक्षाकरीता पीसीबी/पीसीएम ग्रुप दिनांक 16/04/2024 ते 30/04/2024 या कालावधीत महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंन्द्रावर घेण्यात येणार आहे. सदर सामाईक प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांना आॅनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
एमएचटीसीईटी 2024 पीसीएम/पीसीबी ग्रुप संकेतस्थळ आॅनलाईन् अर्ज नोंदणी आणि निश्चीती करणे मुदतवाढ कालावधी दिनांक 02/03/2024 ते दिनांक 08/03/2024
सदर परीक्षेसाठी आॅनलाईन् अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधित उमेदवार व पालक यांनी कृपया नोंद घ्यावी. आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई