क्रंतिविरांची गाथा युवापिढी समोर मांडली तरच आदिवासी वीरांचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांच्या स्मरणात राहील

54

आदिवासी समाजातील सर्व जमातींनी सारे मतभेद बाजूला सारून एकसंघ होऊन आपल्या क्रंतिविरांची गाथा युवापिढी समोर मांडली तरच आदिवासी वीरांचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांच्या स्मरणात राहील असे मत मरोडा येथील क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या जयंती समारोहात अध्यक्ष स्थानावरून बोलताना अशोक येरमे यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना म्हणाले की, आजची सरकारची आदिवासी समाजाप्रती निती बघता समाजाने शिक्षण शेत्रात, छोट्या मोठ्या उद्योग क्षेत्रात प्रगती करून आर्थिक क्षमता वाढविणे काळाची गरज आहे. इतिहासकारांना आदिवासी वीरांचा विसर पडला आहे. बाबुराव सेडमके हे फक्त आदिवासी साठी लढले नसून या परगण्यात वास्तव्यास असलेल्या सर्व समाजबांधवासाठी इंग्रजी सत्तेच्या दडपशाही, जुलमी, अत्याचारी कायद्याच्या विरोधात सर्वांसाठी लढले, मग अशा महान क्रांतिविरांची जयंती शासकीय स्तरावर घेण्यात यायला पाहिजे, परंतु तसे चित्र बघायला मिळत नाही यावरून सरकारची आदिवासी समाजाप्रती भावना स्पष्ट निदर्शनास येते.
आयोजित कार्यक्रम अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका अध्यक्ष अशोक येरमे यांचे आध्यक्षतेखली तर समाज अध्यक्ष, छगन मडावी , ग्राम पंचायत सदस्य अर्चना उईकें, सचिव देवेंद्र मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी मंचावरील पाहुण्यांनी आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिवीर बाबुराव सेडमाके, भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अनिल उईके, यांनी तर आभारप्रदर्शन किशोर मडावी यांनी केले. सायंकाळी गोंडी नृत्य सादर करून सामूहिक भोजनाने हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी, अनिल उईके, किशोर मडावी, अनिल पेंदोर, देविदास मडावी, प्रफुल्ल उईके, संभाजी गेडाम, नागोराव सिडाम, संध्या मडावी, वर्षा उईके, देवांगना गेडाम, वर्षा येरमे, आणि इतरही समाज बांधवांनी परिश्रम घेतले, मोठ्या संख्येने, उत्साहात आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.