बोथली येथे पशुचिकित्सा कृती व मार्गदर्शन शिबीर

46

पशुसंवर्धन विभाग, पस सावली व पशुवैद्यकीय दवाखाना बोथलीच्या वतीने ग्रामपंचायतच्या सहकार्याने ग्रामपंचायत येथे पशुचिकित्सा कृती व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
शिबीराचे उद्घाटन उपसरपंच विजयराव गड्डमवार यांनी केले. अध्यक्षस्थानी ग्राप सदस्या सौ.शारदा कमलाकर पाडेवार होत्या.प्रमुख अतिथी माजी सरपंच्या सौ.खलील सुनिल मराठे,प्रभारी पविअ डॉ बंडू आकनुरवार,विजय नागापुरे,रामचंद्र मामीडवार, विलास येल्लटीवार,राजु मुप्पावार, पोच्चन्ना अलुरवार,ग्राविअ आर.एस. कुरेकार,वासुदेव मराटे होते.प्रथम गोमातेची पुजा करण्यात आली.यावेळी डॉ बंडू आकनुरवार यांनी पशुसंवर्धनाच्या विविध योजना,किसान क्रेडिट कार्ड,राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेबद्दल माहीती देण्यात आली.शिबिरामध्ये औषधोपचार,खच्चीकरण, लसीकरण, गर्भ व वंधत्व तपासणी,जंतोपचार,लहान शस्त्रक्रिया करण्यात आले.
शिबीर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरूडकर,नोडल अधिकारी तथा सहा.पशुसंवर्धन आयुक्त डॉ.सास्तुरकर व संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनिक यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येऊन प्रभारी पविअ डॉ बंडू आकनुरवार,डाॅ.भुवनेश्वर गणवीर,व्रणोपचारक अजय ढेंगरी,परिचर स्वप्निल कुनघाडकर,अमित मामीडवार यांनी परिश्रम घेतले.

शब्दांकन- डॉ बंडू आकनुरवार
प्रभारी पविअ,बोथली