आजही महिलांना समानतेची वागणूक मिळत नसल्याची खंत – वैशाली गांवडे अध्यक्षा ग्राहक तक्रार निवारण आयोग चंद्रपूर

50

*मूल:-स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे लोटली तरी,आजही महिलांना समानतेची वागणूक मिळत नसल्याची आणि महिला आपल्या अधिकारांप्रती जागरुक नसल्याची खंत महिला ग्राहक जागृती सप्ताहाच्या समारोप प्रसंगी प्रमूख अतिथी म्हणून बोलतांना वैशाली गावंडे यांनी व्यक्त केली.

ग्राहक पंचायत महाराष्ट मूल तालुका शाखा मूल च्या वतीने आयोजित ग्राहक जागृति सप्ताह समारोप सोहळा मूल येथील कर्मविर महाविद्यालय व कृषि महाविद्यालय यांच्या संयूक्त विद्यमाने कर्मवीर महाविद्यालय सभागृहात संपन्न झाला.
आयोजित या समारंभात ग्राहक पंचायत महाराष्टाचे मुल तालुका अध्यक्ष दीपक देशपांडे अध्यक्ष स्थांनी होते. तर प्रमूख अतिथी म्हणून श्रीमती वैशाली गावंडे अध्यक्षा चंद्रपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग,प्राचार्य डाॅ.अनिता वाळके आणि प्राध्यापक डाॅ.खुशाल राठोड ,प्राध्यापक बनकर,प्राध्यापक आगलावे ,प्रा.देशमूख उपस्थित होते.

आपल्या भाषणात वैशाली गावंडे मॅडम यांनी आजही स्त्री पुरूष भेदभाव पाळला जात असल्यांची आणि महिलांना कमी लेखन्याची परंपरा कायम असल्याबाबत खंत व्यक्त करीत महिलांना कायद्याने मिळालेल्या समान अधिकारांची केवळ चर्चाच होत असल्याचे व दिलेल्या आरक्षणाचे पालन होत नसल्याचे विविध उदाहरणावरून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या अधिकारांप्रती जागृत होत संविधानातील महत्वाच्या अनूच्छेदांतील कलम १४,१९व२१या तीन कलमांचा अभ्यास करीत महिलांनी पुढे येण्याची आवश्यकता स्पष्ट केली व ज्यामुळे सगळ्यांना कठिणातील कठीण परीक्षाही सहज पार करता येईल असे आश्वासीत केले तर ग्राहक म्हणून वावरत असतांना आपल्या अधिकारांची जाणीव ठेवून वस्तूची निवड करावी व फसवणूक झाल्यानंतर तक्रार करण्याऐवजी त्या तक्रारीचे आपणच कारण बनणाार नाही यांचा प्रयत्न करावा, असे उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींना आवाहन केले.

ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ आणि सुधारीत कायदा २०१९अन्वये मिळालेल्या अधिकाराची माहीती घेत व्यवहार केल्यास आपण आपली फसवणूक टाळू शकतो. त्यातील तरतूदी आणि ग्राहक म्हणून आपले हक्क काय आहे हे समजून घेण्याची आवश्यकता दीपक देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय वक्तव्यातून मांडली.
ग्राहक जागृती सप्ताह समारोप सोहळ्याची सुरूवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,माॅं जिजाऊ ,युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून स्वागत समारंभाने झाली.कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी ग्राहक गित सादर केले.
आपल्या प्रास्ताविकातून डाॅ. अनिता वाळके यांनी आज महिलांनी व्यापलेल्या क्षेत्रातील झेपेचा आढावा घेत महिलादिनांचे आयोजन महिला मध्ये जनजागृती करणे त्यांच्यात विश्वास निर्माण करणे आणि स्वबळावर लढण्यासाठी प्रवृत्त करणे हे उदेश्य समोर ठेवून करण्यात आले असून त्यांना ग्राहक म्हणून असलेल्या हक्काची जाणीव करून देत वेगवेगळ्या प्रकारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट च्या सौजान्याने आयोजीत या कार्यक्रात विद्यार्थ्यांना जी माहिती मिळणार आहे त्यांचा लाभ करून घेत आपली फसवणूक टाळता येण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

राष्ट्रिय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. खुशाल राठोड या प्रसंगी बोलतांना महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव करीत कोणतीही वस्तू खरेदी करतांना पावती मागणे आणि ती जपून ठेवणे किती गरजेचे आहे. हे पटवून देत महिलांनी आपल्या मनाला आवर घालण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली.व शेतक-यांनी बि बियाणे,खते, किटकनाशके वा अन्य वस्तूची खरेदी करतांना पावती मागण्याची सवय लावणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
याच प्रसंगी कर्मवीर महाविद्यालयाच्या योगेशने समायोचीत विचार व्यक्त केले तर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी
कु. प्रतिक्षा सातघरे,व कु. चैताली बेलेकर या विद्यार्थिनींनी महिला दिन व ग्राहक दिन त्यांची व्याप्ती आणि महत्व स्पष्ट करणारी माहिती सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिल्पा देशमुख, व डॉ. गितांशु दिंकवार या कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकद्वयांनी केले. कर्मविर महाविद्यालयातील प्राध्यापक डाॅ.आगलावे यांनी आभार प्रदर्शन केले.
या सोहळ्यात ग्राहक पंचायत महाराष्ट मूल तालूका शाखा मूल चे पदाधिकारी, तुळशीराम बांगरे संघटक रमेश डांगरे व प्रमोद मशाखेत्री मुक्तेश्वर खोब्रागडे तसेच कृषि महाविद्यालय व कर्मवीर महाविद्यालय येथील प्राध्यापकवृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.