मुल तालुक्यातील @रोजगार सेवकांना मिळाला ‘टॅब’

75

 रोजगार हमी योजनेतील कामे आणि डेटा ऑनलाईन (online) पद्धतीने व्हावा यासाठी रोजगार हमी विभागाने पुढाकार घेतला आहे.रोजगार सेवकांना वरिष्ठांकडे सादरीकरण किंवा मंत्रीस्तरावर डेटा पोहोचवण्यासाठी या कागदपत्रांचे वर्गीकरण करावे लागते. तक्ते तयार करावे लागतात. आकडेमोडही असतेच. रोहयोचे अत्यंत जवळचे नाते असल्याने कामांचे वारंवार फोटो काढावे लागतात. मजुरांचेही फोटो काढून ते अपडेट करावे लागतात. ही सारी कामे मोबाईलवर करणे किचकट, जिकिरीचे असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यात वस्तुस्थिती असल्याचे लक्षात आल्यावर सरकार जागृत झाले आहे.आजकाल कागदपत्रे सांभाळणे म्हणजे मोठे आव्हान झाले आहे. रोजगार हमी योजनेतील रोजगार सेवकांना रस्ते, विहिरी आणि इतर कामांची बिले सांभाळावी लागतात. त्यामुळे त्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी रोहयो खाते अपडेट करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात असून सर्व कामे ऑनलाइन पूर्ण करण्यासाठी टॅब दिले .काळाची गरज लक्षात घेऊन प्रत्येकाला टॅब मिळेल. त्यावर ते ऑनलाइन काम करू शकतील. यामुळे ग्रामीण भागात शासकीय कामकाजाची गती काही प्रमाणात वाढली.

 दिनांक 15/05/2024 रोजी पंचायत समिती मुल येथे ग्राम रोजगार सेवक यांना आदर्णीय गट विकास अधिकारी राटोड सर, यांचे उपस्थित टॅब वितरित करण्यात आले त्या प्रसंगी सहायक कार्यक्रम अधिकारी, वनकर सर, तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते