चिरोली-सुशी मार्गावर@आठ लाख पंचाहत्तर हजारची दारु पोलीसांनी पकडली, दोन जण पोलीसांच्या ताब्यात, चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

104

मूल : चिरोली येथुन दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली कडे महेंद्र पीकअप वाहणाने गैरमार्गान देशी दारु नेत असतांना चंद्रपूर येथील स्थानिय गुन्हे शाखेच्या पथकाने चिरोली सुशी मार्गावर ताब्यात घेतली.
मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे चंद्रपूर येथील स्थानिय गुन्हे शाखेचे सपोनि हर्षल एकरे, सपोनी मनोज गदादे, पोउनि विनोद भुरले सहकारी पो. हवा. जयंत चुनारकर, किशोर वैरागडे, रजनीकांत पुट्टावार, चेतन गज्जलवार आणि सतिश अवथडे आदिंनी रात्रो 12 वा. दरम्यान चिरोली सुशी मार्गावर नाकेबंदी करून वाहणांची तपासणी करीत असतांना महेंद्र पिकअप क्र. MH-33-T-2024 मध्ये 100 पेट्या देशी दारू आढळुन आली. पोलीस पथकाने लागलीच पंचसमक्ष चौकशी करून वाहणासह वाहण चालक मनोज जगदिश मुजुमदार (39) रा. एटापल्ली आणि सहकारी करणसिंग ओमसिंग पटवा (29) रा. मूल यांना ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या दारुची किंम्मत 8 लाख 75 हजार असुन वाहणाची किंम्मत 7 लाख असा एकुण 15 लाख 75 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या वाहणातील देशी दारू चिरोली येथील अमोल रामदास ढोरे यांच्या देशी दारू दुकानातील असल्याचे सांगण्यात आले. अटकेत असलेले दोन्ही आरोपी सध्या पोलीस स्टेशन मूल येथील बंदीगृहात आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी अवैद्य दारु विक्रेत्यांच्या मुसक्या आवळणे सुरु केले असुन पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वाखाली अनेक पथके तयर करण्यात आली आहे. मूल स्टेशनच्या हद्दीमधुन लाखोची दारू वाहतुक होत असतांना मूल पोलीसांना माहीती न होता चंद्रपुर येथील स्थानिक गुन्हे शाखेला माहीती होवुन पकडण्यात यावी. यविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यापुर्वी पंधरा दिवसाआधी चंद्रपूर येथी स्थानिय गुन्हे शाखेच्या पथकाने तालुक्यातील भवराळा लगत 8 लाखाचा माल हस्तगत केला होता. हे विशेष.
आठ लाख पंचाहत्तर हजारची दारु पोलीसांनी पकडली, दोन जण पोलीसांच्या ताब्यात, चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई-