शुल्लक कारणावरून युवकाचा खून. परिसरात हळहळ.

154

मूल(प्रती)

शुल्लक कारणावरून वाद झाल्याने बापलेकाने शेजाऱ्याच्या अंगावर धावून जात त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार करीत जागीच ठार केले. ही थरारक घटना मूल तालुक्यातील हळदी येथे शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली.राजेश्वर शेषराव बोधलकर (37) असे मृतकाचे नाव आहे. सुरज गुरुदास पिपरे (२२), गुरुदास नक्टु टिपरे ( 50 ), असे आरोपी बापलेकाची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुमित परतेकी ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेच्या अर्ध्या तासातच आरोपींना ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे.

सविस्तर असे की, घराशेजारी असलेल्या माधव घोंगडे हा आपल्या ताब्यात असलेल्या चिंचेच्या झाडाच्या फांद्या घरावर गेल्याने त्या तोडत होता. दरम्यान, झाडे तोडताना विद्युत तारेचे नुकसान होऊ नये म्हणून सुरज आणि गुरुदास पिपरे यांनी विद्युत पुरवठा खंडित केला. झाडे तोडून झाल्यानंतर विद्युत पुरवठा सुरू करण्यापूर्वी पिपरे यांचे घर हे मुख्य खांबापासून लांब असल्याने विद्युत ताराला लाकडी बल्लीचा टेकू लावला होता. मात्र पिपरे बापलेकाने विद्युत पुरवठा सुरू करताना ती लाकडी बल्ली जुन्याच ठिकाणी न ठेवता चार फूट बाजूला सरकवून लावली. यावरून राजेश्वर बोधलकर यांनी हटकले.

त्यामुळे आरोपी गुरुदास व राजेश्वर यांच्यात शाब्दिक वाद झाला. वाद सुरू असतानाच मुलगा सुरज घरातून कुऱ्हाड घेऊन धावत आला. दरम्यान, गुरुदास पिपरे याने राजेश्वरला धरून ठेवले, तर सुरज पिपरे याने राजेश्वरच्या मानेवर सपासप कुऱ्हाडीचे तीन वार केले. यामध्ये राजेश्वर जागीच गतप्राण झाला. या घटनेने हळदी येथे खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.घराशेजारील केबल बाजूला कर, असे म्हटल्याप्रकरणी रागाच्या भरात बाप, लेकाने घराशेजारील युवकाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केला. हि हृदयद्रावक घटना तालुक्यातील हळदी येथे सकाळी 10.00 वाजता घडली. मृतकाचे नाव राजू शेषराव बोदलकर (वय 30) वर्ष आहे.घराशेजारी असलेल्या झाडाचे फांद्या तोडल्यानंतर लागूनच असलेला केबल बाजूला कर, असा प्रेमाने सांगणाऱ्या घराशेजारील युवकावर सूरज गुरुदास पिपरे (वय 21),आणि गुरुदास नक्तू पिपरे या बाप लेकाने कुऱ्हाडीने वार करून राजू शेषराव बोदलकर या युवकाचा निर्घृण खून केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मृतक हा अत्यंत शांत व संयमी स्वभावाचा होता. मृत्युपश्चात त्याला एक मुलगा,एक मुलगी व पत्नी आहे.