राजूभाउु गेडाम सर यांच्या वर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव!

27

‘लोकमत वृत्तपत्र मूल तालुका प्रतिनिधी यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,हस्ते व वाचकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.राजकीय, सामाजिक, आर्थिक, उद्योग, कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, बांधकाम व्यापार या क्षेत्रांतील मंडळींनी राजूभाउु गेडाम यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थितीने एक रंगबिरंगी आनंदनगरीच निर्माण झालेली बघावयास मिळाली. गेडाम सर यांच्याप्रती असलेली सद्भावना, लोकमत वृत्तपत्र मूल तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या कामांची आठवण ही पदोपदी ताजी होत होती.

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा  वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी.
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हाव हीच शुभेच्छा…!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

अनेकांनी शुभेच्छा देताना उत्स्फूर्तपणे शुभेच्छाचा वर्षाव या निमित्ताने एकमेकांच्या भेटी झाल्या. हास्यविनोदात त्यांचा संवाद रंगला. मुल तालुक्यातील पत्रकार संघ, तसेच वरीष्ठ पत्रकार बंधू तसेच विविध डिजीटल न्यूज चे संपादक उपस्थित होते. सायंकाळी ७ वाजेनंतरही उशिरापर्यंत शुभेच्छांचा वर्षाव चालूच राहिला.

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,
तुम्हाला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच त्यांचा मोबाइल खणखणत राहिला. सोशल मीडियावरही शुभेच्छांची धूम राहिली. व्हॉटस् अॅप, फेसबुकवर क्षणात गेडाम सर यांना शुभेच्छा दिलेली छायाचित्रे झळकत होती. त्याचाही एक आगळा आनंद सोशल मीडियावर सक्रिय असलेल्यांनी लुटला.