परीक्षा झेडपीची अन् लेखी पेपर नागपूर, वर्धा, मुंबईत@आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका अशा पाच संवर्गांच्या परीक्षेचे

49

मागील सहा महिन्यांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद नोकर भरतीला अखेर मुहूर्त लागला. मात्र, आरोग्यसेवक व इतर पदांसाठी उमेदवारांना परीक्षेसाठी थेट नागपूर, वर्धा, मुंबई आणि नाशिक असे दूरवरचे केंद्र मिळाल्याने उमेदवारांची मोठी गैरसोय झाली आहे.

परीक्षा07, 08, 10 & 11, 15 & 17 ऑक्टोबर & नोव्हेंबर 2023, जून & जुलै 2024
परीक्षा वेळापत्रक
वरिष्ठ सहारक (लेखा)
07 ऑक्टोबर 2023
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 08 ऑक्टोबर 2023
विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक
10 ऑक्टोबर 2023
लघूलेखक (निम्न, उच्च श्रेणी), कनिष्ठ सहायक (लेखा)11 ऑक्टोबर 2023
कनिष्ठ अभियंता लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी/विद्युत)15 ऑक्टोबर 2023
पशुधन पर्यवेक्षक, वायरमन, जोडारी 17 ऑक्टोबर 2023
MajhiNaukri Newआरोग्यसेवक, ग्रामसेवक जून 2024
पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य परिचारिका, ग्रामसेवक
जुलै 2024
Mock TestClick Here
मार्गदर्शक पुस्तिका
Click Here
प्रवेशपत्रClick Here

येथे परीक्षेला जाण्यासाठीच चार ते पाच हजारांचा खर्च असल्याने कितीजण परीक्षेला हजेरी लावतात, याविषयी साशंकताच आहे. आधीच नोकरीसाठी नशिबाशी परीक्षा करणार्‍यांची आताची यंत्रणमुळे जीवघेणी परीक्षा सुरू आहे.

नगरसह राज्यात जिल्हा परिषदांची 19 हजार पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेने या पदांची जाहिरात 5 ऑगस्ट 2023 ला प्रसिद्ध केली होती. यात जिल्हा परिषदेच्या 19 संवर्गांतील 937 पदे भरण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक 727 पदे आरोग्य विभागाची आहेत. या भरतीसाठी जिल्ह्यातून 44 हजार 726 अर्ज प्राप्त झाले.

अर्ज भरल्यानंतर पहिल्या टप्प्यात 19 पैकी 11 संवर्गांची परीक्षा कशीबशी डिसेंबर 2023 पर्यंत झाली. मात्र 50 टक्क्यांहून अधिक अर्ज ज्या संवर्गात आहेत त्या आरोग्य सेवक (पुरूष 50 टक्के हंगामी फवारणी), आरोग्य सेवक (पुरूष इतर 40 टक्के), आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका अशा पाच संवर्गांच्या परीक्षेचे वेळापत्रक गेल्या सहा महिन्यांपासून जाहीर होत नव्हते. अखेर ते 27 जून 2024 रोजी जाहीर झाले.

दरम्यान, आरोग्यसेवक महिला, आरोग्यसेवक पुरूष या पदांसाठी मोठ्या प्रमाणात जागा असल्याने येथे अर्जही अधिक प्राप्त झाले आहेत. उमेदवारांनी परीक्षेसाठी चंद्रपूर,अहमदनगर, संभाजीनगर, पुणे अशा जवळच्या परीक्षा केद्रांचे पर्याय अर्ज भरताना भरले. मात्र जेव्हा हॉलतिकीट प्राप्त झाले, त्यात अनेकांना नागपूर, वर्धा, मुंबई, ठाणे, अमरावती असे दूरवरचे परीक्षा स्थळ देण्यात आले आहे. परीक्षेसाठी एवढे दूर कसे पोहोचणार, असा प्रश्‍न उमेदवारांना व त्यांच्या पालकांना पडला आहे.