संजय गांधी निराधार योजनेचे 199 प्रकरणे मंजूर

46

मूल तहसील कार्यालयात तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम तसेच समितीच्या सचिव तथा तहसीलदार मृणाली मोरे, गटविकासअधिकारी, व संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष वंदना अगरकाटे व अशासकीय सदस्य , नायब तहसीलदार ओंकार ठाकरे , सदस्य आदी उपस्थित होते.

दिंनांक 31 जूर्ले सकाळी 1.00 वाजता संजय गांधी निराधार योजना समितीच्या मासिक सभेचे वंदना अगरकाटे रा गडीसूर्ला यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय मूल येथे आयोजन करण्यात आलेले होते. सदर सभेमध्ये खालील प्रमाणे समितीचे अध्यक्ष/सदस्य ,संजय गांधी निराधार योजनेचे कर्मचारी वृंद यांनी उपस्थित राहून खालील विवरणात दर्शविलेले प्रकरण मंजुर /नामंजूर करण्यात आले.

संजय गांधी निराधार योजना पात्र प्रकरण 74 नामंजूर प्रकरण 0 एकूण प्रकरण 74
इंदिरा गांधी विधवा योजना पात्र प्रकरण 17 नामंजूर प्रकरण 0 17
इंदिरा गांधी अपंग योजना 0 0 0
श्रावणबाळ योजना 103 13 116
वृध्दापकाळ योजना 05 01 06
एकूण प्रकरणे 199 14 213

एकूण 213 प्रकरणापैकी 199 प्रकरण निकाली काढण्यात आले असून नामंजूर प्रकरणाची संख्या एकूण 14 आहे.
वरील प्रमाणे प्रकरण मंजूर/नामंजूर करून सभा समाप्त करण्यात आली.