मुंबई : एमएएच सीईटीकडून बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवरून जाहीर करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची वाट पाहणारे उमेदवार cetcell.mahacet.org येथील अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक पाहू शकतात.
वेबसाइटवरील अधिकृत अधिसूचनेनुसार, दुसऱ्या टप्प्याच्या निकालाची संभाव्य तारीख २८ ऑगस्ट २०२४ आहे. त्यानंतर इच्छुक उमेदवारांना २९ ऑगस्ट २०२४ ते ६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
उमेदवार अधिकृत वेबसाइटवर संभाव्य वेळापत्रकानुसार ०९ सप्टेंबर २०२४ रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करण्याची अपेक्षा करू शकतात. १० ते १२ सप्टेंबर २०२४ या कालावधीत उमेदवारांना आपल्या तक्रारी सादर करता येणार असून अंतिम गुणवत्ता यादी १३ सप्टेंबर २०२४ जाही केली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील निकालाची संभाव्य तारीख – २८ ऑगस्ट २०२४
ऑनलाइन अर्ज नोंदणी – १९ ऑगस्ट २०२४ ते ०६ सप्टेंबर २०२४
तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे – ०९ सप्टेंबर २०२४
तक्रारी सादर करणे – १० सप्टेंबर २०२४ ते १२ सप्टेंबर २०२४
अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे – १३ सप्टेंबर २०२४
अधिक माहितीसाठी cetcell.mahacet.org येथे अधिकृत वेबसाइटला भेट द्या.