सेंट अँन्स हायस्कूल द्वारा हर घर तिरंगा रॅलीचे यशस्वी आयोजन

42

शासनाच्या हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत सेंट अँन्स हायस्कूल,मुल द्वारा दि.१३ ऑगस्टला तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.विहिरगाव मार्गे गांधी चौक ते चंद्रपूर मार्गाने सेंट अँन्स हायस्कूल येथे रॅलीची सांगता झाली.
मुख्याध्यापिका रेव्ह.सी.शॅलेट सेबॅस्टियन यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापिका रेव्ह.सी.लिली सेबॅस्टियन यांच्या सहकार्याने या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थी प्रतिनिधी क्रिष्णा चिताडे व राशी उईके यांनी रॅलीचे नेतृत्व केले.विद्यार्थ्यांनी भारत माता की जय,वंदे मातरम् यासारख्या घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले व परिसर दणाणून सोडला.
शिक्षक धनराज कुडे, मयुर कामडे,अमोल कामिडवार,चेतना रेकलवार,सरिता मेश्राम,स्वाती मद्रिवार, सी.शिजी,लालाजी बावणे, केवलराम अंबोणे, पायल जीभकाटे,खुशी गुरूनाणी यांनी रॅली यशस्वीतेसाठी सहकार्य केले.