पंचायत समिती मुलचा उपक्रम@स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने

40

” उमेद च्या वतीने तिरंगा विक्री व राखी विक्री केंन्द्राला ग्राहकांचा उस्फुर्त असा प्रतिसाद”
आज दिनांक 13/08/2024 ला उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती मूल अंतर्गत दोन दिवसीय तिरंगा विक्री व राखी विक्री स्टॉल चे उदघाटन मा.श्री राठोड सर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती मूल ह्यांच्या हस्ते तसेच मा. श्री. वासनिक सर, गट विकास अधिकारी पंचायत समिती सावली यांच्या विशेष उपस्थित थाटात पार पडले.
सदर महोत्सवात महिलांनी तयार केलेले तिरंगा,राखी, गांडूळखत विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले.
तहसील कार्यालय आणी पंचायत समिती ह्यांच्या मधोमध महोत्सव सुरु असल्याने ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. नितीन वाघमारे , तालुका अभियान व्यवस्थापक हयांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जयश्री खोब्रागडे, वसिम काझी,राहुल मडावी, मंजू कामळी, मयूर भोपे,सिद्धार्थ वाडके, मयुर गद्दमवार, विवेक सोनुले, काजूल लाकडे आदी व समूहातील महिलांनी सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.