मूल /प्रतिनिधी
विद्या प्रसारण मंडळ मुल द्वारा संचालित सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष
नरसिंगभाऊ गनवेणवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी शाळेतील नर्सरी ते इयत्ता आठवी च्या ४३२ विद्यार्थ्याना सी. एन. आर. ब्रदर्स च्या सहकार्याने स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले.
शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. मारोतराव पुल्लावार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला प्रा. महेश पानसे,
सुखदेव चौथाले , गणेश मांडवकर, अशोकराव कडुकार, प्रशांत बोबाटे, सुनील गायधने, उषाताई शेंडे, विद्याताई बोबाटे, सुवर्णा पिपरे, ईंदुताई मडावी, ज्योती मोहबे, उषाताई थोरात, रोशनी लाटेलवार, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप, पदवीधर शिक्षक राजू गेडाम व सर्व समितीचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमा नंतर सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित पालक व समिती चे सदस्यांना राजगडचे सामाजिक कार्यकर्ते रूपेश पाटील मारकवार यांचे कडुन संपुर्ण विद्यार्थ्याना अल्पोहार
देण्यात आला. कार्यक्रमे संचालन सहाय्यक शिक्षक
बंडु अल्लीवार तर उपस्थितांचे
आभार सहाय्यक शिक्षिका रिना मसराम यांनी मानले.